Badrinath ki Dulhania : वरुण धवन-आलिया भट्टच्या नावे आगळे-वेगळे रेकॉर्ड!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2017 16:48 IST2017-03-19T11:16:37+5:302017-03-19T16:48:06+5:30
बॉलिवूडची चंचल जोडी वरुण धवन आणि आलिया भट्ट यांच्या ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या सिनेमाने बॉक्स आॅफिसवर सध्या धूम उडवून ...

Badrinath ki Dulhania : वरुण धवन-आलिया भट्टच्या नावे आगळे-वेगळे रेकॉर्ड!
ब लिवूडची चंचल जोडी वरुण धवन आणि आलिया भट्ट यांच्या ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या सिनेमाने बॉक्स आॅफिसवर सध्या धूम उडवून दिली आहे. कारण हा सिनेमा रिलीज झाल्यापासून आजपर्यंत अनेक सिनेमे आले अन् गेले पण, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ आजही सिनेमागृहात प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. त्यामुळे हा सिनेमा लवकरच शंभर कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळवेल, यात शंका नाही. त्याचबरोबर या सिनेमाच्या यशामुळे वरुण आणि आलियाच्या नावे एक आगळे-वेगळे रेकॉर्डही निर्माण झाले आहे.
![]()
वरुण आणि आलियाच्या ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या सिनेमाने रेकॉर्ड निर्माण करताना शाहरुख खानच्या ‘रईस’, अक्षय कुमारच्या ‘जॉली एलएलबी-२’ आणि हृतिक रोशन याच्या ‘काबिल’ या सिनेमांना मात दिली आहे. कारण या वर्षात सोमवार आणि दुसºया शुक्रवारी सर्वाधिक कमाई करण्याचे रेकॉर्ड ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या सिनेमाच्या नावावर कोरले गेले आहे. त्याचबरोबर वरुण आणि आलिया या जोडीचा हा सिनेमा आतापर्यंतचा सर्वाधिक हिट ठरला आहे.
वरुण आलियाने ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या सिनेमाअगोदर ‘स्टुडेंट आॅफ द इयर’ आणि ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ या दोन सिनेमांमध्ये एकत्र काम केले आहे. हे दोन्ही सिनेमे बॉक्स आॅफिसवर हिट ठरले आहेत. मात्र त्यांना शंभर कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळवता आले नाही. त्यामुळे या सिनेमांच्या तुलनेत ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ हा सिनेमा आघाडीवर आहे.
![]()
वरुण-आलियाच्या सिनेमांची कमाई
- स्टुडेंट आॅफ द इयर- ७० कोटी
- हम्प्टी शर्मा की दुल्हनिया- ७६.८१ कोटी
- बद्रीनाथ की दुल्हनिया- ८३.७७ कोटी (आतापर्यंत)
‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या सिनेमाची कमाई वाढत असून, हा सिनेमा लवकरच शंभर कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळवण्याची शक्यता आहे. शशांक खेतान यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाची निर्मिती करण जोहर याने केली आहे.