'वाईट परिस्थिती तुम्हाला खूप काही शिकवते'; नेमकं असं का म्हणाली शिल्पा शेट्टी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 00:05 IST2023-09-13T00:02:30+5:302023-09-13T00:05:24+5:30
Shilpa shetty: शिल्पाचं हे वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत येत आहे.

'वाईट परिस्थिती तुम्हाला खूप काही शिकवते'; नेमकं असं का म्हणाली शिल्पा शेट्टी?
शिल्पा शेट्टी (shilpa shetty) हे नाव आज कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. आजवरच्या कारकिर्दीमध्ये शिल्पाने अनेक सुपरहिट सिनेमा दिले आहेत. मात्र, गेल्या काही काळापासून तिचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे.परंतु, सोशल मीडियावर ती कमालीची सक्रीय आहे. गेल्या काही काळापासून शिल्पा तिच्या प्रोफेशनल लाइफसह पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत येत आहे. यामध्येच तिने लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. या पुरस्कार सोहळ्यात तिने केलेलं एक वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे.
"सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. ज्यांना मी Most stylish Power Icon आहे असं वाटतंय आणि त्यासाठी माझी निवड केली त्या सगळ्यांचे आभार. हा खरंतर लोकांचा पुरस्कार आहे. कारण, जेव्हा लोक माझ्याविषयी चांगलं बोलतात त्यावेळी मला खूप छान वाटतं. लोकांच्या प्रेमामुळेच आज मी या मंचावर आहे. त्यामुळे त्यांचे मनापासून धन्यवाद", असं शिल्पा म्हणाली.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर शिल्पाला काही मजेशीर प्रश्न विचारण्यात आले. यात ऑक्वर्ड सिच्युएशनमध्ये ती कोणत्या गोष्टींची निवड करते असे काही प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांमध्ये 'बॅड हेअर डे की बॅड ड्रेस डे' यापैकी तुला कोणती सिच्युएशन तुला बऱ्यापैकी सांभाळता येईल असा प्रश्न शिल्पाला विचारण्यात आला. त्यावर, "या सगळ्या परिस्थितीमधून मी गेलीये. त्यामुळे दोन्ही परिस्थिती काय फार चांगल्या नाहीत. पण, प्रत्येक वाईट परिस्थिती तुम्हाला काही ना काही शिकवते. खासकरुन काय करु नये हे शिकवते", असं शिल्पा म्हणाली.
दरम्यान, शिल्पा उत्तम अभिनयासह तिच्या फिटनेसमुळेही चर्चेत येत असते. शिल्पा बऱ्याचदा सोशल मीडियावर तिच्या योगा, वर्कआऊटचे फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असते. गेल्या काही काळापासून शिल्पा रुपेरी पडद्यापासून दूर आहे. मात्र, लवकरच ती सुखी या सिनेमात झळकणार आहे.