मुंबई अनलॉक होताच रणवीर सिंगही शूटिंगसाठी सज्ज, लवकरच करणार मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 04:34 PM2021-06-21T16:34:18+5:302021-06-21T16:38:11+5:30

आजचे शूट महत्त्वाचे असल्याने रणवीर सिंग त्याच्या नेहमीच्या उत्साही ‘रेडी टू गो’ मूडमध्ये दिसला. जेव्हा त्याच्यासारखा एखादा उत्साही अभिनेता सेटवर येतो, तेव्हा, सर्वकाही बदलून जाते. सर्वकाही पूर्वपदावर येत असल्याचा इंडस्ट्रीकरिता हा एक सकारात्मक सिग्नल आहे.”

Back on the sets! Ranveer Singh returns to work as Mumbai unlocks | मुंबई अनलॉक होताच रणवीर सिंगही शूटिंगसाठी सज्ज, लवकरच करणार मोठी घोषणा

मुंबई अनलॉक होताच रणवीर सिंगही शूटिंगसाठी सज्ज, लवकरच करणार मोठी घोषणा

googlenewsNext

दुसऱ्या लाटेनंतर मुंबई अनलॉक झाल्यावर सुपरस्टार रणवीर सिंग शुटींगकसाठी सज्ज झाला आहे. आज सकाळी लवकरच मोठ्या उत्साहाने रणवीर शूटच्या लगबगीत रणवीर दिसला. “प्रत्येकवेळी लॉकडाऊननंतर लागेच  शूटींगला सुरुवात करण्यासाठी त्याची धडपड असते. मोठ्या उत्साहाने त्याने त्याच्या कामाला सुरुवात केल आहे. कोरोनाचा फटका मोठ्या प्रमाणावर मनोरंजन क्षेत्रालाही बसला आहे. आता सगळंकाही सुरुळीत होतंय त्यामुळे मनोरंजन इंडस्ट्रीला चालना मिळाली पाहिजे असे रणवीरचे मत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शूटवर परतल्याचा एक वेगळाच आनंद असल्याचा त्याने म्हटलंय.

 

शासनाच्या आखणीनुसार सर्व प्रोटोकॉल पाळण्याबाबत सर्व प्रोडक्शन हाऊस बारकाईन दक्षता घेत आहेत. महासाथीचा फटका बसलेल्या उद्योग क्षेत्राचे कामकाज पूर्ववत व्हावे यासाठी रणवीर आग्रही असून त्यात आपले योगदान देण्याकरिता तो घराबाहेर पडला आहे,” समोर आलेल्या माहितीनुसार त्याला एक मोठे शूट त्याला संपवायचे आहे. 

लवकरच याविषयीची सविस्तर माहितीही तो जाहीर करणार आहे. आजचे शूट महत्त्वाचे असल्याने रणवीर त्याच्या नेहमीच्या उत्साही ‘रेडी टू गो’ मूडमध्ये दिसला. जेव्हा त्याच्यासारखा एखादा उत्साही अभिनेता सेटवर येतो, तेव्हा, सर्वकाही बदलून जाते. सर्वकाही पूर्वपदावर येत असल्याचा इंडस्ट्रीकरिता हा एक सकारात्मक सिग्नल आहे.”

आपल्या भूमिकांसोबतच रणवीर त्याच्या हटके स्टाईलमुळे रसिकांचं लक्ष वेधून घेतो. त्याची हटके आणि आकर्षक ड्रेसिंग स्टाईल कायमच रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली आहे. शूटिंगवर जाणं असो किंवा मग एखाद्या कार्यक्रमात उपस्थित राहणं, दरवेळी रणवीर आपल्या हटके आणि आकर्षक ड्रेसिंगने रसिकांची मनं जिंकतो. त्यामुळेच की शेटवर शूटिंगसाठी जाताना  त्याच्या ड्रेसिंग स्टाईलनेच सा-यांचे लक्ष वेधून घेतले. सोशल मीडियावर व्हायरल झालेले रणवीर सिंगचे फोटो रसिकांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत. 

Web Title: Back on the sets! Ranveer Singh returns to work as Mumbai unlocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.