'बाहुबली' फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया लवकरच बांधणार लग्नगाठ, कोण आहे तिचा होणारा नवरा?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 05:56 PM2022-11-16T17:56:30+5:302022-11-16T17:57:02+5:30

Tamannaah Bhatia :बाहुबली फेम अभिनेत्री तमन्ना भाटियाने नुकताच लग्नासाठी होकार दिल्याचे समोर आले आहे.

'Baahubali' fame actress Tamannaah Bhatia will tie the knot soon, who is her future husband? | 'बाहुबली' फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया लवकरच बांधणार लग्नगाठ, कोण आहे तिचा होणारा नवरा?

'बाहुबली' फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया लवकरच बांधणार लग्नगाठ, कोण आहे तिचा होणारा नवरा?

googlenewsNext

बाहुबली फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया(Tamannaah Bhatia)च्या घरी लवकरच सनई चौघडे वाजणार आहेत. होय, बॉलिवूडची ब्युटी क्वीन तमन्ना भाटियाच्या लग्नाची चर्चा जोरात सुरू आहे. तमन्ना लवकरच मुंबईतील एका व्यावसायिकासोबत लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. 

बॉलिवूड लाईफच्या रिपोर्ट्सनुसार, तमन्ना भाटियाने वधू बनण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. अभिनेत्री लवकरच लग्न करणार आहे. अशा परिस्थितीत, ती कोणत्याही नवीन प्रकल्पावर स्वाक्षरी करत नाही आहे, कारण ती लवकरच लग्नाच्या तयारीत व्यस्त होणार आहे आणि तिला स्वतःसाठी थोडा वेळ हवा आहे.


रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, तमन्नाने बिझनेसमनचा प्रस्ताव स्वीकारला असून लग्नासाठी होकारही दिला आहे. जरी अभिनेत्रीने अद्याप तिच्या लग्नाच्या वृत्ताला दुजोरा दिला नसला तरी, तिने त्याचे खंडनही केलेले नाही. असेही बोलले जात आहे की तमन्ना भाटिया लवकरच तिच्या लग्नाबाबत अधिकृत घोषणा करू शकते.


तमन्ना भाटिया हिची गणना बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये केली जाते. या अभिनेत्रीने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये दमदार काम केले आहे. तमन्ना हे देखील साऊथ सिनेसृष्टीतील एक मोठे नाव आहे. तमन्नाने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत, त्यापैकी एक ब्लॉकबस्टर चित्रपट बाहुबली आहे.

Web Title: 'Baahubali' fame actress Tamannaah Bhatia will tie the knot soon, who is her future husband?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.