दिशा पाटनीची जबरदस्त ‘किक’ ; काही तासांत मिळाले लाखो व्ह्युज!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2019 04:00 PM2019-02-24T16:00:00+5:302019-02-24T16:00:02+5:30

दिशाचा एक व्हिडीओ वा-याच्या वेगाने व्हायरल होतोय. या व्हिडीओतील दिशाचा अंदाज यापूर्वी तुम्ही कधीही पाहिला नसेल.

baaghi actress disha patani sexy gym video is going viral | दिशा पाटनीची जबरदस्त ‘किक’ ; काही तासांत मिळाले लाखो व्ह्युज!!

दिशा पाटनीची जबरदस्त ‘किक’ ; काही तासांत मिळाले लाखो व्ह्युज!!

googlenewsNext
ठळक मुद्देदिशाच्या वर्कफ्रन्टबद्दल बोलायचे झाल्यास, लवकरच ती सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. सलमानचा आगामी चित्रपट ‘भारत’मध्ये दिशा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री दिशा पाटनी सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियावरचे तिचे हॉट आणि सेक्सी फोटो चाहत्यांना वेड लावतात. याशिवाय तिच्या वर्क आऊटच्या व्हिडीओंवरही चाहत्यांच्या उड्या पडतात. आता दिशाचा असाच  एक व्हिडीओ वा-याच्या वेगाने व्हायरल होतोय. या व्हिडीओतील दिशाचा अंदाज यापूर्वी तुम्ही कधीही पाहिला नसेल. व्हिडीओत दिशा एक जबदस्त किक मारताना दिसतेय. तिची ही किक पाहून चाहते इतके क्रेजी झालेत ती आत्तापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.


दिशा पटानीप्रमाणेच तिचा बॉयफ्रेन्ड टायगर श्रॉफ हाही स्टंट करताना दिसतो. त्याच्या स्टंटचे व्हिडीओ सुद्धा असेच व्हायरल होतात. पण दिशाचा हा स्टंट व्हिडीओ टायगरपेक्षाही हिट ठरलाय. तुम्हीही पाहा आणि कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा.


दिशाच्या वर्कफ्रन्टबद्दल बोलायचे झाल्यास, लवकरच ती सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. सलमानचा आगामी चित्रपट ‘भारत’मध्ये दिशा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. या चित्रपटातही दिशा अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. ‘भारत’ हा चित्रपट यंदा ईदच्या मुहूर्तावर रिलीज होतोय. दिशा व सलमानशिवाय कॅटरिना कैफ, तब्बू, सुनील ग्रोव्हर यात प्रमुख भूमिकेत आहेत. दिशाच्या झोळीत भाईजानचा आणखी एक चित्रपट पडला असल्याचीही खबर आहे. होय,  सलमान व दिशाची जोडी लवकरच एका मेगा बजेट फिल्ममध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे. हा चित्रपट कोणता? तर ‘किक 2’. काही दिवसांपूर्वी दिशाला साजिद नाडियाडवाला यांच्या आॅफिसात स्पॉट केले गेले होते. ही भेट ‘किक 2’संदर्भातचं होती, असे सांगण्यात आले होते. सूत्रांचे मानाल तर याचवर्षी अखेरिसपर्यंत या चित्रपटाचे शूटींग सुरु होणार आहे.

Web Title: baaghi actress disha patani sexy gym video is going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.