दोन वेळचा TIME सन्मान विजेता आयुष्मान खुराना अन् दुआ लिपा न्यूयॉर्कमधील 'TIME 100 गाला'मध्ये सहभागी होणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 06:10 PM2024-04-25T18:10:12+5:302024-04-25T18:11:27+5:30

युष्मान खुराना न्यूयॉर्कमधील प्रतिष्ठित TIME 100 गाला कार्यक्रमात सहभागी होणार आहे

Ayushmann Khurrana And Dua Lipa To Attend Time 100 Gala Event In New York Actor Has Been Honoured Twice | दोन वेळचा TIME सन्मान विजेता आयुष्मान खुराना अन् दुआ लिपा न्यूयॉर्कमधील 'TIME 100 गाला'मध्ये सहभागी होणार!

दोन वेळचा TIME सन्मान विजेता आयुष्मान खुराना अन् दुआ लिपा न्यूयॉर्कमधील 'TIME 100 गाला'मध्ये सहभागी होणार!

बॉलिवूड स्टार आणि युथ आयकॉन आयुष्मान खुराना सध्या चर्चेत आला आहे.  पुन्हा एकदा आयुष्माननं भारताचं नाव जागतिक पातळीवर उंचावलं आहे. आयुष्मान खुराना न्यूयॉर्कमधील प्रतिष्ठित TIME 100 गाला कार्यक्रमात सहभागी होणार आहे.  या कार्यक्रमात जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींचा सन्मान केला जाणार आहे.  आयुष्मान 'TIME 100 गाला' कार्यक्रमात जगातील सर्वात मोठी पॉप गायिका दुआ लीपासोबत झळकणार आहे.

TIME मॅगझिनने आयुष्मान खुरानाला दोनदा सन्मानित केलं आहे. आयुष्मानला 2023 मध्ये 'TIME100 Impact Award 2023' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. या पुरस्कारासाठी निवड झालेला तो एकमेव भारतीय होता. तर त्याआधी 2020 मध्ये TIME 100 साठी त्याची निवड झाली होती. सिनेमात दिलेल्या अमूल्य योगदानासाठी आणि बाल हक्क संरक्षणासाठी युनिसेफ राजदूत म्हणून केलेल्या अनुकरणीय कार्यासाठी त्याचा सन्मान करण्यात आला. 

'TIME 100 गाला' या कार्यक्रमामध्ये जगातील दिग्गज मंडळी एकत्र येणार आहेत. सोफिया कोपोला (चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक), इलियट पेज (अभिनेता आणि चित्रपट निर्माता), काइली मिनोग (गायक-गीतकार आणि अभिनेत्री),  मायकेल जे. फॉक्स (चित्रपट अभिनेता), ताराजी पी. हेन्सन (अमेरिकन अभिनेत्री), टोरी बर्च (डिझाइनर) यांसारख्या प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित व्यक्तीही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Ayushmann Khurrana And Dua Lipa To Attend Time 100 Gala Event In New York Actor Has Been Honoured Twice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.