Ayushmann Mannat : 'मन्नत' समोरुन जाताना मीही एक मन्नत मागितली, 'आयुष्मान'ची पोस्ट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 10:26 AM2022-11-28T10:26:37+5:302022-11-28T11:22:32+5:30

बॉलिवुडचा किंग खान शाहरुख खानचे मन्नत बघण्यासाठी पर्यटकांची, चाहत्यांची गर्दी होते. तर काल नेहमीप्रमाणे मन्नत बाहेर गर्दी असताना एक मन्नत समोरुन जाणाऱ्या एकाला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली.

ayushmann-khurana-asks-mannat-outside-shahrukh-khan-mannat-bunglow-for-his-upcoming-film-an-action-hero | Ayushmann Mannat : 'मन्नत' समोरुन जाताना मीही एक मन्नत मागितली, 'आयुष्मान'ची पोस्ट व्हायरल

Ayushmann Mannat : 'मन्नत' समोरुन जाताना मीही एक मन्नत मागितली, 'आयुष्मान'ची पोस्ट व्हायरल

googlenewsNext

Ayushmann Mannat :  मुंबईत येणारे पर्यटक एकदा तरी बॉलिवुड कलाकारांची घरं बघायला जातात.अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान यासांरख्या कलाकारांचे घर पाहण्याची संधी कोणी सोडत नाही.  त्यातच बॉलिवुडचा किंग खान शाहरुख खानचे Mannat मन्नत बघण्यासाठी पर्यटकांची, चाहत्यांची गर्दी होते. तर काल नेहमीप्रमाणे मन्नत बाहेर गर्दी असताना एक मन्नत समोरुन जाणाऱ्या एकाला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली. शाहरुख सारखेच स्टारडम असणारा तो कोण होता असा प्रश्न पडला असेल. 

तर तो होता अभिनेता आयुष्मान खुराना. मन्नत समोरुन जाताना हात जोडुन त्याने मन्नत मागितली आहे. 'मन्नत से गुजर रहा था तो एक मन्नत मांगीट असे कॅप्शन त्याने दिले आहे. तर शाहरुखच्या बाजीगर चित्रपटाचे टायटल सॉंग लावले आहे. मन्नत बघण्यासाठी आलेल्या चाहत्यांना हे आयुष्माननेच सरप्राईज दिले. मग काय सगळे मोबाईल कॅमेरे आयुष्मानच्या दिशेने वळले. आयुष्मान चा हा फोटो खुपच सुंदर आला असुन तुफान व्हायरलही होत आहे. आयुष्मान च्या या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. मन्नत म्हणजे मुंबईतील सर्वात प्रसिद्ध घरांपैकी एक आहे. शाहरुख खान काहीही ओळख नसताना बॉलिवुडमध्ये आला आणि आज तोच बॉलिवुडचा किंग आहे. त्याने मेहनतीने हे 'मन्नत' चे स्वप्न पुर्ण केले आहे. त्यामुळे इतर कलाकारांना शाहरुखबाबत प्रचंड आदर आहे. तोच आदर आयुष्माननेही या फोटोतुन दाखवला आहे.

आयुष्मान खुरानाचा 'एन एक्शन हिरो' हा आगामी सिनेमा येत आहे. याच सिनेमाच्या यशासाठी त्याने मन्नत मागितली असं दिसतंय. २ डिसेंबर रोजी आयुष्मानचा 'एन एक्शन हिरो' सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

Web Title: ayushmann-khurana-asks-mannat-outside-shahrukh-khan-mannat-bunglow-for-his-upcoming-film-an-action-hero

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.