'वॉन्टेड'साठी आयेशा टाकिया नव्हती पहिली पसंती, सलमान खानला घ्यायचं होतं या अभिनेत्रीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 12:00 IST2025-12-26T11:59:01+5:302025-12-26T12:00:11+5:30
Salman Khan And Ayesha Khan's Wanted Movie: प्रभू देवाने दिग्दर्शित केलेल्या आणि बोनी कपूर यांनी निर्मिती केलेल्या 'वॉन्टेड' या चित्रपटात सलमानच्या जोडीला आयेशा टाकिया मुख्य भूमिकेत दिसली होती. परंतु, तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की 'वॉन्टेड'साठी आयशा टाकिया ही निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती.

'वॉन्टेड'साठी आयेशा टाकिया नव्हती पहिली पसंती, सलमान खानला घ्यायचं होतं या अभिनेत्रीला
सलमान खानच्या करिअरमधील सर्वात यशस्वी आणि गाजलेल्या चित्रपटांचा उल्लेख केला, तर त्यात 'वॉन्टेड' हे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. हा तोच चित्रपट होता ज्याने सलमानच्या घसरणाऱ्या करिअरला पुन्हा उभारी दिली आणि त्याला बॉलिवूडचा खरा 'सुलतान' बनवले. प्रभू देवाने दिग्दर्शित केलेल्या आणि बोनी कपूर यांनी निर्मिती केलेल्या या चित्रपटात सलमानच्या जोडीला आयेशा टाकिया मुख्य भूमिकेत दिसली होती. परंतु, तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की 'वॉन्टेड'साठी आयशा टाकिया ही निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती. या गोष्टीचा खुलासा तब्बल १६ वर्षांनंतर निर्माते बोनी कपूर यांनी केला आहे.
'वॉन्टेड' चित्रपटात आयेशा टाकियाने 'जाह्नवी'ची भूमिका साकारली होती, जिच्या भोवती चित्रपटाची कथा फिरते. सलमान खान या चित्रपटात 'राधे' आणि अंडरकव्हर पोलीस इन्स्पेक्टर 'राजवीर शेखावत'च्या भूमिकेत दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आणि आयेशाच्या कामाचेही भरभरून कौतुक झाले. मात्र, हे नशिबाचेच खेळ होते की तिला हा चित्रपट मिळाला, कारण निर्मात्यांनी आधी अनेक नावाचा विचार केला होता.
बोनी कपूर म्हणाले...
नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान बोनी कपूर यांनी सांगितले की, "वॉन्टेडसाठी सलमानचे नाव आम्ही आधीच निश्चित केले होते, पण अभिनेत्रीचा शोध बराच काळ सुरू होता. खुद्द सलमान खानने या चित्रपटासाठी कतरिना कैफचे नाव सुचवले होते. मात्र, काही कारणास्तव ते शक्य झाले नाही. त्यानंतर जिनिलिया डिसूझा आणि इलियाना डिक्रूझ यांच्या नावाचाही विचार करण्यात आला, पण तिथेही गोष्ट बनली नाही. अखेर आयेशा टाकियाची एन्ट्री झाली आणि तिने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आमचा निर्णय योग्य ठरवला."
दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक होता 'वॉन्टेड'
२००९ मध्ये प्रदर्शित झालेला 'वॉन्टेड' हा चित्रपट मुळात दाक्षिणात्य सिनेमाचा हिंदी रिमेक होता. २००६ मध्ये तेलगू भाषेत 'पोकिरी' या नावाने हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, जो ब्लॉकबस्टर ठरला होता. त्यानंतर प्रभू देवा यांनी बॉलिवूडमध्ये 'वॉन्टेड' सादर केला आणि हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या प्रचंड यशस्वी ठरला.