जगण्याचा आनंद घेण्यासाठी आयशा टाकियाने घेतला होता चित्रपटातून ब्रेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2017 12:54 IST2017-07-08T07:20:40+5:302017-07-08T12:54:44+5:30
बॉलिवूड अभिनेत्री आयशा टाकिया लग्नानंतर चित्रपटांपासून लांब गेली होती. यावर आयशा म्हणते, आयुष्यातील इतर गोष्टींचा आनंद लुटण्यासाठी मी चित्रपटांपासून ...
.jpg)
जगण्याचा आनंद घेण्यासाठी आयशा टाकियाने घेतला होता चित्रपटातून ब्रेक
ब लिवूड अभिनेत्री आयशा टाकिया लग्नानंतर चित्रपटांपासून लांब गेली होती. यावर आयशा म्हणते, आयुष्यातील इतर गोष्टींचा आनंद लुटण्यासाठी मी चित्रपटांपासून दूर गेले होते. जवळपास 4 वर्षांच्या ब्रेकनंतर आयशा मोठ्या पडद्यावर परतते आहे. बोरीवली का ब्रूस ली या चित्रपटातून ती पुनरागमन करते आहे. लग्नानंतर तू चित्रपटात फारशी दिसली नाही असा प्रश्न आयशाला विचारणात आला यावर ती म्हणाली, ''मी खूप वयात कॅमेऱ्यासमोर आलो. अभिनयाची सुरुवात मी लहान वयातच केली. त्यामुळे सामान्य मुलीचे आयुष्य कसे असते ते मला कळलेच नाही.वॉटेंड चित्रपटानंतर मला असे वाटले मला काही काळ सामान्य मुलीचे आयुष्य जगायचे आहे. मला स्वत:ला समजून घ्यायचे होते. हा काळ माझ्यासाठी सगळ्यात वेगळा होता. मी स्वत:चा शोध घेण्याचा प्रयत्न केला.'' आयशा एक बालकार म्हणून एक अॅडमध्ये आणि म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती. समाजवादी पार्टीचे प्रमुख नेते अबू आझमी यांच्या मुलगा फरहान आझमीसोबत तिने लग्न केले. सलमानसोबत आलेल्या वॉटेंड या चित्रपटाने आयशला खरी ओळख मिळवून दिली. या चित्रपटातील तिची आणि सलमानची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली होती. मात्र या नंतर ती मोठ्या पडद्यावरुन गायब झाली. आयशाने आपल्या करिअरची सुरुवात 2004मध्ये आलेल्या टार्जन: अ वंडर कार यातून केली होती. यातील अभिनयासाठी तिला आयफचा नवोदित अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला होता.आयशाच्या बोरीवली का ब्रूस ली याचित्रपटाचे 70 टक्के पूर्ण झाले आहे. याआधी ती एका व्हिडीओत दिसली होती. या म्युझिक व्हिडिओची सगळी गाणी अमित मिश्राने गायली आहेत.