चित्रपटांपासून दूर असली तरी आयशा जुल्का बिझनेसमधून कमावते कोट्यवधी, 50व्या वर्षीही दिसते तितकीच ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 08:00 AM2023-07-28T08:00:00+5:302023-07-28T08:00:02+5:30

आयशाने ‘कुर्बान’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर जो जीता वही सिकंदर, संग्राम, खिलाडी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली आणि मग अचानक बॉलिवूडमधून गायब झाली.

Ayesha jhulka birthday actress now handling multiple businesses know about jo jeeta wahi sikander actress net worth | चित्रपटांपासून दूर असली तरी आयशा जुल्का बिझनेसमधून कमावते कोट्यवधी, 50व्या वर्षीही दिसते तितकीच ग्लॅमरस

चित्रपटांपासून दूर असली तरी आयशा जुल्का बिझनेसमधून कमावते कोट्यवधी, 50व्या वर्षीही दिसते तितकीच ग्लॅमरस

googlenewsNext

खिलाडी , जो जीता वही सिकंदर , बलमा , रंग आणि वक्त हमारा है' यांसारख्या सुपरहिट बॉलिवूड सिनेमांमध्ये झळकलेली अभिनेत्री आयशा जुल्का गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये कुठेही नव्हती. अलिकडेच तिने वेबसिरीजच्या माध्यमातून डिजीटल पदार्पण केलंय. हॅप्पी फॅमिली या वेबसिरिजमध्ये ती दिसली होती. हॅप्पी फॅमिली या वेबसिरिजमध्ये काही दिवसांपूर्वी रिलीज झाली. आयशाने ‘कुर्बान’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर जो जीता वही सिकंदर, संग्राम, खिलाडी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली आणि मग अचानक बॉलिवूडमधून गायब झाली.

२८ जुलै १९७२ साली श्रीनगरमध्ये आयशाचा जन्म झाला होता. बॉलिवूडच्या काही आवडत्या अभिनेत्रींपैकी असणाऱ्या आयशाने खूप लवकर बॉलिवूडला अलविदा केलं. आयशा आज आपला ५१वा वाढदिवस साजरा करते आहे. 2003 पर्यंत आयशाचे करिअर जवळजवळ संपुष्टात आले होते. याकाळात ती सिनेमांमध्ये मुख्य नायिकेच्या नव्हे तर सहायक अभिनेत्रीच्या रुपात झळकू लागली होती. याचकाळात तिने लग्नाचा निर्णय घेतला. 2003 मध्ये आयशाने कंस्ट्रक्शन टायकून समीर वाशीसोबत लग्न केलं. आता आयशा स्वत:ही एक यशस्वी बिझनेस वूमन बनली आहे.

पतीसोबत कंस्ट्रक्शन, स्पा आणि स्वत:ची क्लोदिंग लाईन असा सगळा व्याप आयशा सांभाळते. या सर्व बिझनेसचा व्याप अब्जावधीच्या घरात आहे. लग्नानंतर आयशाने अचानक बॉलिवूडला रामराम ठोकला. अर्थात बॉलिवूड सोडण्याच्या निर्णयाचा आयशाला मुळीच पश्चाताप नाही. मात्र करिअरदरम्यान काही सिनेमे नाकारल्याचा पश्चाताप तिला आजही होतो.

Web Title: Ayesha jhulka birthday actress now handling multiple businesses know about jo jeeta wahi sikander actress net worth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.