सलमान खान नाही हा अभिनेता आहे कतरिना कैफचा खरा ‘गॉडफादर’!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 12:36 IST2021-02-05T12:35:13+5:302021-02-05T12:36:07+5:30
सेलिब्रिटी फोटोग्राफर अतुल कसबेकर याने हा खुलासा

सलमान खान नाही हा अभिनेता आहे कतरिना कैफचा खरा ‘गॉडफादर’!!
कतरिना कैफचा बॉलिवूडमधील गॉडफादर कोण? असे विचारल्यावर चाहत्यांच्या डोक्यात एकच नाव येते. ते म्हणजे, भाईजान सलमान खान. सलमानने अनेक नव्या चेह-यांना फिल्म इंडस्ट्रीत संधी दिली. कतरिना सुद्धा त्यापैकीच एक़ सलमानने कतरिनाला लॉन्च केले, हे खरंय. पण तिच्या फिल्मी करिअरमधील खरा गॉडफादर सलमान खान नसून शाहरूख खान आहे. आश्चर्य वाटले ना? पण हे खरे आहे. प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर अतुल कसबेकर याने हा खुलासा केला आहे.
बॉलिवूड हंगामाला दिलेल्य एका मुलाखतीत अतुलने सुमारे 20 वर्षांपूर्वीचे एक कॅलेंडर शूटबद्दल आणि कॅटबद्दल अनेक खुलासे केलेत. या शूटमध्ये कतरिना कैफ मॉडेल म्हणून झळकली होती.
अतुलने सांगितले, ‘त्यावेळी कतरिना बहुधा 18-19 वर्षांची असावी. वयाप्रमाणेच अगदी अवखळ होती. कॅलेंडर शूटसाठी तिला स्विम सूटमध्ये पोज द्यायच्या होत्या. पण तिला पोज जमेनात. कारण तिला त्याची सवय नव्हती. ते फोटोशूट पूर्ण करण्यासाठी आम्हाला बराच वेळ खर्च करावा लागला होता. पण शेवटी कॅटचे मनासारखे फोटो मिळाल्याचे समाधान होते. कॅलेंडर लॉन्च पार्टी झाली, तेव्हा शाहरूख खानच्या हस्ते कॅलेन्डर लॉन्च करण्यात आले. योगायोग असा की त्याचे सर्वच फोटो कतरिना कैफच्या अगेन्स्ट दाखवण्यात आले होते. त्यावेळी कतरिनाचे फोटो पाहून सगळेच हैराण झाले होते. ही घोड्यावर बसलेली मुलगी कोण? असे जो तो विचारत होता. सर्वांना तिचे फोटो आवडले होते. माझ्या मते, तिथून कतरिनाच्या करिअरला गती मिळाली.
पुढचा कतरिनाचा फिल्मी प्रवास तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहेच. तूर्तास तिच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच ती ‘फोन भूत’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत ईशान खट्टर आणि सिद्धार्थ चतुर्वेदी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन गुरमीत सिंग यांनी केले आहे तर फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे शूटिंग उदयपूरमध्ये सुरु आहे. याशिवाय कतरिना कैफ सलमान खानसोबत ‘एक था टायगर’च्या तिसºया पार्टमध्ये सुद्धा दिसणार आहे.