'जवान'नंतर अ‍ॅटलीचा नवीन सिनेमा, वरुण धवनसोबत करणार 'बेबी जॉन'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 04:02 PM2024-02-05T16:02:22+5:302024-02-05T16:03:41+5:30

Varun Dhawan's new movie Baby John: 'जवान'नंतर अ‍ॅटलीने त्याच्या नवीन सिनेमाची घोषणा केलीय. अ‍ॅटलीच्या आगामी सिनेमात वरुण धवन प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.

Atlee's new film after 'Jawan', 'Baby John' with Varun Dhawan | 'जवान'नंतर अ‍ॅटलीचा नवीन सिनेमा, वरुण धवनसोबत करणार 'बेबी जॉन'

'जवान'नंतर अ‍ॅटलीचा नवीन सिनेमा, वरुण धवनसोबत करणार 'बेबी जॉन'

वरुण धवन (Varun Dhawan) हा बॉलिवू़डमधील लोकप्रिय अभिनेता. वरुणला आपण आजवर अनेक सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. 'बदलापूर', 'कुली नंबर १', 'कलंक', 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' अशा विविध सिनेमांमधून वरुणने त्याच्या अभिनयाची छाप पाडलीय. वरुण धवनला २०२३ मध्ये 'बवाल' सिनेमांमधून पाहिलंय. वरुण २०२४ मध्ये कोणत्या नवीन सिनेमात झळकणार याची सर्वांना उत्सुकता होती. अखेर प्रतीक्षा संपली आहे. वरुणच्या आगामी सिनेमाची घोषणा झाली असून 'बेबी जॉन' (Baby John) असं त्याच्या आगामी सिनेमाचं नाव आहे. विशेष म्हणजे २०२३ शाहरुखच्या (Shah Rukh Khan) जवानमधून ब्लॉकबस्टर कामगिरी करणारा अॅटली (Atlee Kumar)  'बेबी जॉन' सिनेमाच्या निर्मितीची धूरा सांभाळणार आहे.


'जवान'नंतर 'बेबी जॉन' हा अॅटलीचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. सिनेमाची आज घोषणा करण्यात आली असून टीममार्फत एक व्हि़डीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओमध्ये दाक्षिणात्य संस्कृतीची झलक बघायला मिळते. वरुण भन्नाट अॅक्शन अंदाजात पाहायला मिळतो. त्याच्या हातावर एक पक्षी असून तो सिंहासनावर बसलेला दिसतोय. या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा बॉलिवूडला दाक्षिणात्य संस्कृतीची भुरळ पडलेली दिसतेय. बेबी जॉनच्या अनाऊंसमेट व्हिडीओ रिलीज होताच लोकांनी चांगला प्रतिसाद दिलाय. या सिनेमात वरुणसोबतच अभिनेत्री वामिका गाबी झळकणार आहे. याशिवाय अभिनेत्री किर्थी सुरेश  या बेबी जॉनच्या निमित्ताने बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय.

वरुण, किर्थी, वामिकासोबतच सिनेमात जॅकी श्रॉफ, राजपाल यादव हे तगडे कलाकार पाहायला मिळत आहेत. थमन हा लोकप्रिय संगीतकार सिनेमाच्या संगीताची धूरा सांभाळणार आहे. मुराद खेतानी, ज्योती देशपांडे आणि प्रिया अॅटली या तिघांनी मिळून सिनेमाची निर्मिती केलीय. याशिवाय ए. कलीस्वरन हे सिनेमाच्या दिग्दर्शनाची धूरा सांभाळत आहेत. ३१ मे २०२४ ला हा सिनेमा संपूर्ण भारतात रिलीज होतोय. सिनेमाची जबरदस्त घोषणा पाहून आतापासूनच सर्वांना बेबी जॉन पाहण्याची उत्सुकता लागली आहे. गेल्या काही वर्षात कॉमेडी आणि रोमँटिक भूमिका करणारा वरुण यानिमित्ताने पुन्हा एकदा पॉवरपॅक अॅक्शन करताना दिसणार आहे.
 

Web Title: Atlee's new film after 'Jawan', 'Baby John' with Varun Dhawan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.