केएल राहुलसोबत खेळताना दिसली चिमुकली इवारा, अथिया शेट्टीने शेअर केले खास फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 16:31 IST2025-12-28T16:28:10+5:302025-12-28T16:31:23+5:30
लेक 'इवारा' आणि नवरोबा क्रिकेटपटू केएल राहुलवरील प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी अथिया शेट्टी चुकवत नाही.

केएल राहुलसोबत खेळताना दिसली चिमुकली इवारा, अथिया शेट्टीने शेअर केले खास फोटो
Athiya Shetty Daughter Evaarah : बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. ती आपली लेक 'इवारा' आणि नवरोबा क्रिकेटपटू केएल राहुलवरील प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी चुकवत नाही. नुकतंच अथियाने त्यांच्या कौटुंबिक सुट्ट्यांमधील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये तिची चिमुकली 'इवारा' आणि केएल राहुल यांची एक झलक पाहायला मिळाली आहे. बाप-लेकीचं नातं पाहून चाहते भारावून गेले आहेत.
अथियाने इंस्टाग्रामवर ख्रिसमस सेलिब्रेशन काही फोटो शेअर केले. त्यातील एका फोटोत केएल राहुलने इवाराला हवेत उचलून धरलं आहे, तर चिमुकल्या इवाराने आपले पाय वडिलांच्या छातीवर ठेवले आहेत. जरी अथियाने अद्याप इवाराचा चेहरा उघड केला नसला, तरी लाल ड्रेसमधील इवाराची ही झलक चाहत्यांच्या आवडली. अथियाने स्वादिष्ट जेवण, ख्रिसमस ट्री, चर्च आणि स्वतःचा एक सुंदर सेल्फी देखील पोस्ट केला आहे. तिने या पोस्टला "२०२५ चा शेवट" असे कॅप्शन दिले आहे.
अथियानं २३ जानेवारी २०२३ मध्ये केएल राहुलसोबत लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर दोन वर्षांनी त्यांनी गोड न्यूज दिली. २४ मार्च २०२५ रोजी अथियाने मुलीला जन्म दिला. दरम्यान, अथियाने २०१५ मध्ये 'हिरो' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती 'मुबारकां' आणि 'मोतीचूर चकनाचूर' सारख्या चित्रपटांमध्ये झळकली. सध्या ती आपल्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. सुनील शेट्टी यांच्या मते अथियाने अभिनय क्षेत्रातून माघार घेण्याचा निर्णय स्वतःहून घेतला. तिच्या शेवटच्या चित्रपटानंतर तिला अनेक प्रस्ताव आले होते, परंतु तिने कोणताही चित्रपट स्वीकारला नाही.