ठरलं! 5 स्टार हॉटेलात नाही तर ‘या’ ठिकाणी होणार अथिया शेट्टी व केएल राहुलचं लग्न!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 12:16 PM2022-09-06T12:16:23+5:302022-09-06T12:18:31+5:30

Athiya Shetty and KL Rahul's wedding : होय, अथिया व के. एल. राहुलचं लग्न शाही थाटात होणार, हे तर नक्की आहे. पण कुठे? तर आता लग्नाचं स्थळही ठरलं आहे.

athiya shetty kl rahul get married at khandala bungalow | ठरलं! 5 स्टार हॉटेलात नाही तर ‘या’ ठिकाणी होणार अथिया शेट्टी व केएल राहुलचं लग्न!!

ठरलं! 5 स्टार हॉटेलात नाही तर ‘या’ ठिकाणी होणार अथिया शेट्टी व केएल राहुलचं लग्न!!

googlenewsNext

क्रिकेटपटू केएल राहुल ( KL Rahul) आणि अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty ) लवकरच लग्न करणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या कपलच्या लग्नाची चर्चा आहे. तर आता या लग्नाबद्दलची एक मोठी अपडेट समोर आली आहे. होय, अथिया व के. एल. राहुलचं लग्न शाही थाटात होणार, हे तर नक्की आहे. पण कुठे? तर आता लग्नाचं स्थळही ठरलं आहे.
होय, अथिया व के.एल. राहुल एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये नाही तर एका 17 वर्षे जुन्या घरात लग्नाच्या आणाभाका घेणार आहेत.  आज तकने दिलेल्या वृत्तानुसार,  सुनील शेट्टी लेकीच्या लग्नाची जोरदार तयारी करत आहे. हा लग्नसोहळा काही मोजक्याच लोकांच्या उपस्थित पार पडणार आहे.  केएल राहुलच्या शेड्युलनुसार त्यांच्या लग्नाची तारीख काढली जाणार आहे. पण लग्नाचं स्थळ मात्र ठरलं आहे. अथिया आणि केएल यांचं लग्न सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील घरी होणार आहे.

खंडाळा येथील घर हे सुनील शेट्टीला प्रचंड आवडतं. या घराशी त्याच्या भावना जुळलेल्या आहेत. 17 वर्षांपूर्वी सुनीलने हे घर बांधलं होतं. या अलिशान घरात आजूबाजूला हिरवळ आहे, लाल मातीमध्ये हे घर उभारलेलं आहे. याच घरात अथिया व केएल यांचा लग्नसोहळा पार पडेल.

केएल राहुल आणि अथिया शेट्टी हे गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आता डिसेंबर महिन्यात ते लग्नबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे.  

सुरूवातीला अथिया व केएल यांच्यापैकी कुणीही अधिकृतपणे या नात्याची कबुली दिली नव्हती. पण डेटींगच्या चर्चेला हवा देण्याचं काम मात्र त्यांनी न चुकता केलं होतं. दोघांचे एकत्र फोटो शेअर करणं, एकत्र बाहेर फिरणं, एक दुस-यांचे फोटो शेअर करत त्यावर क्यूट कमेंट करणं यामुळे दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.   
अथिया शेट्टी हिने ‘हिरो’या चित्रपटातून डेब्यू केला. पण हा चित्रपट दणकून आपटला. अनीस अज्मीच्या ‘मुबारकां’मध्ये अथियाला दुसरी संधी मिळाली. पण हा चित्रपटही फ्लॉप ठरला. ‘मोतीचूर चकनाचूर’ हा तिचा तिसरा सिनेमाही सुपरडुपर फ्लॉप झाला. तिसरा चित्रपटही फ्लॉप ठरल्यानंतर अथियाच्या करिअरची नौका बुडताना दिसतेय. पण दुसरीकडे अथियाच्या लव्ह लाईफची चर्चा जोरात आहे. 

Web Title: athiya shetty kl rahul get married at khandala bungalow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.