आशुतोष यांनी साईन केला प्रियांकाचा ‘व्हेंटिलेटर’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2016 17:48 IST2016-08-13T12:18:11+5:302016-08-13T17:48:11+5:30
प्रियांका चोप्रा सध्या तिच्या हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. साहजिक इतक्यात ती कुठल्याही बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये दिसणार नाही. पण हॉलिवूडमध्ये कितीही ...

आशुतोष यांनी साईन केला प्रियांकाचा ‘व्हेंटिलेटर’!
प रियांका चोप्रा सध्या तिच्या हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. साहजिक इतक्यात ती कुठल्याही बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये दिसणार नाही. पण हॉलिवूडमध्ये कितीही व्यस्त असली तरी प्रियांकाचे स्वत:च्या प्रॉडक्शन हाऊसकडे काटेकार लक्ष आहे. तिथे बसून प्रॉडक्शन हाऊसच्या कामाकडे ती लक्ष देतेय. प्रियांकाच्या प्रॉडक्शन हाऊसचा नवा प्रोजेक्ट म्हणजे ‘व्हेंटिलेटर’ हा मराठी सिनेमा. म्हणजेच प्रियांका चोप्राची ‘पर्पल पेबल पिक्चर’ ही कंपनी चित्रपटाची निर्मिती करत आहे भलीमोठी स्टारकास्ट असलेला आणि प्रियांका चोप्राची निर्मिती असलेला ‘व्हेंटिलेटर’ हा मराठी चित्रपट आॅक्टोबरमध्ये येण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर या चित्रपटात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. आशुतोषसह अभिनेता जितेन्द्र जोशी यांचीही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. आशुतोष यांना नुकतेच या चित्रपटासाठी साईन करण्यात आले. त्यामुळे तब्बल १८ वर्षांनंतर आशुतोष गोवारीकर अभिनय करताना दिसतील. ‘व्हेंटिलेटर’ची निर्माती प्रियांका स्वत: पाहुणी कलाकार म्हणून या चित्रपटात हजेरी लावणार आहे. ‘फेरारी की सवारी’ फेम दिग्दर्शक राजेश मापुस्कर हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत.