या व्यक्तीमुळे आयुष्यभर अविवाहित राहिल्या आशा पारेख, त्यांच्यावर करायच्या जीवापाड प्रेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 17:02 IST2021-03-17T16:59:24+5:302021-03-17T17:02:46+5:30

आशा पारेख यांनी बॉलिवूडमध्ये अनेक हिट सिनेमे दिले. प्रोफेशनल लाईफ इतकेच त्यांचे पर्सनल लाईफ सुद्धा चर्चेत राहिले.

Asha Parekh remained single because she was in love with nasir hussain | या व्यक्तीमुळे आयुष्यभर अविवाहित राहिल्या आशा पारेख, त्यांच्यावर करायच्या जीवापाड प्रेम

या व्यक्तीमुळे आयुष्यभर अविवाहित राहिल्या आशा पारेख, त्यांच्यावर करायच्या जीवापाड प्रेम

ठळक मुद्देबॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता आमिर खानचे काका आणि दिग्गज निर्माते-दिग्दर्शक नासिर हुसैन यांच्यावर आशा पारेख यांचे प्रेम होते.

बॉलिवूडचा एक काळ गाजवणाऱ्या आशा पारेख यांनी चाहत्यांना वेड लावले. त्यांनी स्वबळावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. गुजरातच्या महुआ येथे मध्यवर्गीय गुजराती कुटुंबात आशा पारेख यांचा जन्म झाला. आशा पारेख यांनी बॉलिवूडमध्ये अनेक हिट सिनेमे दिले. प्रोफेशनल लाईफ इतकेच त्यांचे पर्सनल लाईफ सुद्धा चर्चेत राहिले.

बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता आमिर खानचे काका आणि दिग्गज निर्माते-दिग्दर्शक नासिर हुसैन यांच्यावर आशा पारेख यांचे प्रेम होते. नासीर हुसैन यांनी अशा पारेख यांना ‘दिल देके देखो’साठी साईन केले. हा चित्रपट हिट झाला अन् आशा पारेख रातोरात स्टार झाल्या. यानंतर नासीर हुसैन यांनी आशा यांना आपल्या सहा चित्रपटांसाठी साईन केले होते. ‘जब प्यार किसी से होता है’,‘फिर वो ही दिल लाया हूँ’,‘तिसरी मंजिल’,‘बहारों के सपने’,‘प्यार का मौसम’,‘कारवाँ’ असे हे सहाही चित्रपट हिट ठरले होते.

आशा पारेख आणि नासिर हुसैन यांचे दीर्घकाळ अफेअर होते. पण दोघांचे लग्न होऊ शकले नाही. आशा पारेख त्यांच्या प्रेमात पडल्या त्यावेळी नासिर साहेब विवाहित होते. नासिर यांनी संसार मोडून आपल्याशी लग्न करावे, हे आशा यांना मान्य नव्हते. त्याचमुळे दोघांनी लग्न केले नाही. पुढे आशा यांनी कधीच लग्न केले नाही.

आशा पारेख यांनी एका मुलाखतीत आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. नासिर साहेब हे माझ्या आयुष्यात आलेले पहिले आणि शेवटचे पुरुष होते. त्यांच्यावर माझे खूप प्रेम होते. पण मला त्यांचे घर तोडायचे नव्हते. माझ्या आणि त्यांच्या कुटुंबात कधीच मतभेद झाले नाहीत. मला कधीच त्यांना त्यांच्या पत्नी आणि मुलांपासून विभक्त करायचे नव्हते. याच भीतीमुळे मी कधी त्यांच्यासोबत लग्न केले नाही. माझे लग्न व्हावे, ही माझ्या आईची इच्छा होती. तिने माझे लग्न व्हावे, म्हणून प्रयत्नदेखील केले होते. पण मला माझ्या आवडीच्या व्यक्तीसोबतच लग्न करायचे होते. तसे होऊ शकले नाही. म्हणून मी आयुष्यभर लग्नच केले नाही, असे त्यांनी सांगितले होते. तसेच आशा पारेख यांच्या द हिट गर्ल या ऑटोबायग्राफीत देखील या गोष्टीचा उल्लेख करण्यात आला आहे. 

Web Title: Asha Parekh remained single because she was in love with nasir hussain