​आशा भोसलेंच्या रेस्टॉरंटचा ‘मिशेलिन गाईड’मध्ये समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2016 13:28 IST2016-10-21T12:20:45+5:302016-10-21T13:28:48+5:30

आपल्या जादुई आवाजाने संपूर्ण जगाला मोहून टाकणाऱ्या आशा भोसले यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. मँचेस्टर ...

Asha Bhosale's restaurant is included in 'Michelin Guide' | ​आशा भोसलेंच्या रेस्टॉरंटचा ‘मिशेलिन गाईड’मध्ये समावेश

​आशा भोसलेंच्या रेस्टॉरंटचा ‘मिशेलिन गाईड’मध्ये समावेश

ल्या जादुई आवाजाने संपूर्ण जगाला मोहून टाकणाऱ्या आशा भोसले यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. मँचेस्टर येथील त्यांच्या ‘आशाज्’ या रेस्टॉरंटचा अत्यंत मानाच्या मानल्या जाणाऱ्या ‘मिशेलिन गाईड २०१७’मध्ये समावेश करण्यात आला आहे. हा सन्मान मिळवणारे ते मँचेस्टरमधील पहिलेच रेस्टॉरंट ठरले आहे.

ग्रेटर मँचेस्टर भागातील केवळ २५ रेस्टॉरंट्सची या गाईडसाठी निवड करण्यात आली असून आगामी ‘मँचेस्टर फूड अँड ड्रिंक फेस्टिव्हल’ पुरस्कारांमध्ये ‘बेस्ट फ्रंट आॅफ हाऊस टीम’ या श्रेणीतदेखील या रेस्टॉरंटला शॉटलिस्ट करण्यात आले आहे. उद्घाटनानंतर केवळ एक वर्षांत अतिशय चांगली कामगिरी करणारे ‘द आशाज्’  हे पर्यटक आणि खवय्यांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले आहे.

या रेस्टॉरंटमध्ये ‘एआरआयएल ग्रुप’ने गुंतवणूक केली असून हे दोन मजली रेस्टॉरंट पीटर स्ट्रीटवर सहा हजार चौ. फुट जागेवर स्थित आहे. अत्यंत सुबक, कलात्मक आणि मॉडर्न इंटेरिअर असणाऱ्या ‘द आशाज्’च्या अपर ग्राऊंड फ्लोअरवर १०० जणांसाठी रेस्टॉरंट तर खाली खासगी डायनिंग स्पेस आणि ७० जणांची व्यवस्था असणारे कॉकटेल बार ‘बॉलिबार’ आहे.

आशा भोसले यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या हॉटेल चेनमधील हे इंग्लंडमधील दुसरे रेस्टॉरंट आहे. त्यांचे बर्मिंगहॅमस्थित पहिले रेस्टॉरंट तर मागील आठ वर्षांपासून प्रत्येक वर्षी ‘मिशेलिन गाईड’मध्ये झळकतंय. येथील अनेक डिशेसच्या रेसिपी या आशा भोसले यांनी स्वतः सांगितलेल्या आहेत. तसेच त्यांच्या रेस्टॉरंटर्ससाठी त्या स्वत: मसाल्यांची निवड करतात. जगभरातील दहा रेस्टॉरंटमध्ये हे मसाला वापरले जातात. 

The Asha
इंडियन स्पायसेस : आशाजी @ ‘द आशाज्’

आशाजींनी २००२ साली वाफी सिटी, दुबई येथे पहिले रेस्टॉरंट सुरू केले होते. आज जगभरातील विविध ठिकाणी त्यांनी त्यांच्या रेस्टॉरंट बिझनेसचा विस्तार केला आहे. त्यांनी त्यांच्या रेस्टॉरंटमधील पदार्थातून जगाला भारतीय खाद्यपदार्थांची दखल घ्यायला लावली आहे. भारतीय डिशेसना मॉडर्न ट्विस्ट देऊन लोकांच्या जीभेवर अविस्मरणीय चव सोडणारा मेनू अशी ‘द आशाज्’ची खासियत आहे.

Web Title: Asha Bhosale's restaurant is included in 'Michelin Guide'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.