आर्यन खानने का केले इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2016 18:07 IST2016-12-16T18:02:18+5:302016-12-16T18:07:40+5:30
सध्या बॉलिवूड कलाकारांच्या कीडसची खूपच चर्चा रंगत आहे. त्यात बॉलिवूडचा किंग खानचा मुलगा आर्यन खानची चर्चाच निराळी असल्याचे पाहायला ...

आर्यन खानने का केले इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट?
स ्या बॉलिवूड कलाकारांच्या कीडसची खूपच चर्चा रंगत आहे. त्यात बॉलिवूडचा किंग खानचा मुलगा आर्यन खानची चर्चाच निराळी असल्याचे पाहायला मिळत आहे. आता हेच पाहा ना, नुकतेच आर्यनने त्याचे इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट केले आहे. आर्यन त्याच्या खासगी इन्स्टाग्राम अकाऊंटवर जे काही फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करायचा ते सर्व फोटो इतर काही अकाऊंट्सवरही वापरले जायचे. जसे की, आर्यनच्या खासगी अकाऊंटवरील फोटो आर्यन खान फॅन्स क्लब किंवा इतर काही अकाऊंट्सकडून वापरले जायचे. त्यामुळेच आर्यनने त्याचे इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट केले आहे असे म्हटले जात आहे. आर्यनने त्याचे इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट केल्यानंतर ज्या इतर अकाऊंटद्वारे त्याचे फोटो वापरले गेले होते त्यांनीही त्यांच्या अकाऊंटवरुन आर्यनचे फोटो डिलीट केले आहेत. काही खासगी कारणांमुळे आर्यनने त्याचे इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शाहरुखचा मुलगा आर्यन लवकरच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करु शकतो असा अंदाजही वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सध्यातरी तो शिक्षण आणि करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे. बी टाऊनमध्ये सध्या अशाही चर्चा सुरु आहेत, की आपल्या कुटुंबाला प्रसारमाध्यमांपासून आणि विविध चर्चांपासून दूर ठेवण्यासाठी शाहरुखच्या सांगण्यावरुनच आर्यनने त्याचे इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट केले आहे. त्यामुळे आता यामागचे खरे कारण मात्र कोणालाच ठाऊक नाहीये. पण, आर्यनने त्याचे इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट केल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये काहीशी नाराजी पसरली असणार यात शंकाच नाही. आता मात्र आर्यनच्या सोशल मीडियावरील पोस्ट पाहण्यापासून त्याच्या चाहत्यांना वंचित रहावे लागणार हे नक्कीच.