‘DDLJ’ च्या रिमेकमध्ये आर्यन करणार शाहरुखला रिप्लेस; 'ही' स्टारकिड होणार सिमरन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2023 06:00 PM2023-08-27T18:00:00+5:302023-08-27T18:00:00+5:30

‘DDLJ’ च्या रिमेकविषयी दिग्दर्शकांचा मोठा खुलासा

aryan khan-nysa-devgn-perfect-casting-for-dilwale-dulhania-le-jayenge-remake-says-mukesh-chhabra | ‘DDLJ’ च्या रिमेकमध्ये आर्यन करणार शाहरुखला रिप्लेस; 'ही' स्टारकिड होणार सिमरन

‘DDLJ’ च्या रिमेकमध्ये आर्यन करणार शाहरुखला रिप्लेस; 'ही' स्टारकिड होणार सिमरन

googlenewsNext

शाहरुख (shahrukh khan) आणि काजोल (kajol) यांचा तुफान गाजलेला सिनेमा म्हणजे 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'. हा सिनेमा आज एव्हरग्रीन सिनेमा म्हणून ओळखला जातो. केवळ देशातच नाही तर विदेशातही या सिनेमाने तुफान लोकप्रियता मिळवली. त्यामुळेच आजही ‘DDLJ’ प्रेक्षक आवडीने पाहतात. विशेष म्हणजे बॉक्स ऑफिसवर गाजलेल्या या सिनेमाचा लवकरच रिमेक करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नाही तर या रिमेकमध्ये शाहरुखला त्याचा लेक आर्यन खान रिप्लेस करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

अलिकडेच प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांनी डीडीएलजे च्या रिमेकवर एक मोठं भाष्य केलं आहे. त्यानुसार,  लवकरच या सिनेमाचा रिमेक येणार आहे. इतकंच नाही तर या रिमेकमध्ये कोणता कलाकार मुख्य भूमिकेत झळकेल याविषयी फरीदून शहरयार यांच्याशी चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलं. झालेल्या या चर्चेत आर्यन खानला रिमेकमध्ये घेण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

"आर्यन एक उत्तम अभिनेता आहे. तसंच त्याच्या एक वेगळाच चार्मही आहे. त्यामुळे डीडीएलजेमधील राहुलच्या भूमिकेसाठी आर्यन एकदम योग्य आहे. तसंच या सिनेमात सिमरनच्या रोलसाठी अजय-काजोलची लेक निसा हिचा विचार केला जात आहे. निसा सध्या अभिनयाचं शिक्षण घेत आहे. त्यामुळे या भूमिकेसाठी ती योग्य आहे", असं मुकेश छाब्रा म्हणाले.

दरम्यान, शाहरुख आणि काजोल ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि तितकीच लोकप्रिय जोडी आहे. इतकंच नाही तर ते एकमेकांचे चांगले मित्रदेखील आहे. त्यामुळे त्यांच्या मुलांचीही तितकीच छान मैत्री आहे. म्हणूनच, डीडीएलजेच्या रिमेकमध्ये आर्यन आणि निसाची जोडी शोभून दिसेल असं म्हटलं जात आहे. परंतु, अद्याप या रिमेकविषयी आणि स्टारकास्टविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Web Title: aryan khan-nysa-devgn-perfect-casting-for-dilwale-dulhania-le-jayenge-remake-says-mukesh-chhabra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.