रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये रामाची एन्ट्री! अरुण गोविल यांच्यामुळे बिग बींचा पत्ता कट?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 08:43 AM2024-02-14T08:43:53+5:302024-02-14T08:44:24+5:30

नितेश तिवारींच्या 'रामायणा'त अरुण गोविल दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

arun govil to play raja dashrath role in ranbir kapoor nitesh tiwari ramayan | रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये रामाची एन्ट्री! अरुण गोविल यांच्यामुळे बिग बींचा पत्ता कट?

रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये रामाची एन्ट्री! अरुण गोविल यांच्यामुळे बिग बींचा पत्ता कट?

नितेश तिवारींच्या 'रामायण' या आगामी सिनेमाची चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. या सिनेमात रणबीर कपूर प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणार आहे. तर दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीता मातेच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. आता 'रामायण'मध्ये राम म्हणून घराघरात पोहोचलेल्या अरुण गोविल यांची एन्ट्री झाली आहे. 

'रामायण'मध्ये बिग बी अमिताभ बच्चन राजा दशरथ ही भूमिका साकारणार असल्याची चर्चा होती. पण, आता नितेश तिवारींच्या 'रामायण'मध्ये अरुण गोविल यांची एन्ट्री झाल्याने अमिताभ बच्चन यांचा पत्ता कट झाला आहे. 'ईटाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, अरुण गोविल 'रामायण'मध्ये राजा दशरथाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. त्यामुळे राम म्हणून घराघरात पोहोचलेले अरुण गोविल आता दशरथाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. 

बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षीत 'रामायण' सिनेमात रणबीर कपूर, साई पल्लवीबरोबरच रकुल प्रीत सिंहची वर्णी लागली आहे. रकुल या सिनेमात शृपणखेच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सनी देओल या सिनेमात हनुमानाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. दाक्षिणात्य अभिनेता यश 'रामायण'मध्ये रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे.

'रामायण' सिनेमात प्रभू श्रीरामाची भूमिका साकारण्यासाठी रणबीर कपूर खूप मेहनत घेत आहे. यासाठी रणबीरने नॉनव्हेज आणि दारू सोडल्याचं समोर आलं होतं. तर रामाच्या भूमिकेसाठी तो स्पेशल ट्रेनिंगही घेणार असल्याची चर्चा होती. येत्या मार्च महिन्यापासून या सिनेमाचं शूटिंग सुरू होणार आहे. 

Web Title: arun govil to play raja dashrath role in ranbir kapoor nitesh tiwari ramayan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.