अरूण गवळींच्या बायोपिकला होतोय उशीर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2016 10:41 IST2016-07-24T05:11:48+5:302016-07-24T10:41:48+5:30

 अर्जुन रामपाल याने नुकतीच ‘कहानी २’ ची शूटींग पूर्ण केली आहे. त्याने नंतर अरूण गवळी यांच्या जीवनावर आधारित बायोपिकमध्ये ...

Arun Gawli biopic is delayed! | अरूण गवळींच्या बायोपिकला होतोय उशीर !

अरूण गवळींच्या बायोपिकला होतोय उशीर !

 
र्जुन रामपाल याने नुकतीच ‘कहानी २’ ची शूटींग पूर्ण केली आहे. त्याने नंतर अरूण गवळी यांच्या जीवनावर आधारित बायोपिकमध्ये काम करायला सुरूवात केली. निर्मात्यांना अर्जुनचा लुक आऊट करायचा नव्हता.

अंधेरीतील व्हर्साेवा व्हिलेज येथील काही महत्त्वाच्या शॉट्सचे शूटींग पार पडले आहे. त्यानंतर ते जूनमध्ये बाहेरील भागांमध्ये शूट करायला बाहेर पडले आहेत. सोबो येथे काही अ‍ॅक्शन सिक्वेन्स शूट करण्यात येणार आहेत.

चित्रपटाची शूटींग जूनमध्ये संपणे गरजेचे होते. मात्र दिग्दर्शक अशिम अहलुवालिया यांच्यामुळे चित्रपटाची शूटींग सप्टेंबरपर्यंत लांबली. अरूण गवळी यांच्या जीवनावर आधारित ही कथा असून यात सेन्सॉर बोर्डाला खटकतील असे काहीही सीन्स नकोत म्हणून फारच विचारपूर्वक चित्रपटाची शूटींग सुरू आहे. 

arjun gawali

Web Title: Arun Gawli biopic is delayed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.