"तो त्याच्याच धुंदीत असतो...", 'दृश्यम ३'मधून अक्षय खन्नाच्या एक्झिटनंतर त्याच्या विचित्र स्वभावाबाबत अरशद वारसीचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 14:24 IST2025-12-28T14:24:11+5:302025-12-28T14:24:46+5:30
'धुरंधर'च्या यशानंतर अक्षय खन्नाच्या डिमांड वाढल्या असून त्याने त्याच्या आगामी दृश्यम ३ सिनेमातून एक्झिट घेतली आहे. त्यानंतर आता बॉलिवूड अभिनेता अरशद वारसीने अक्षय खन्नाच्या विचित्र स्वभावाबाबत खुलासा केला आहे.

"तो त्याच्याच धुंदीत असतो...", 'दृश्यम ३'मधून अक्षय खन्नाच्या एक्झिटनंतर त्याच्या विचित्र स्वभावाबाबत अरशद वारसीचा खुलासा
'धुरंधर' सिनेमामुळे अक्षय खन्ना पुन्हा एकदा प्रसिद्धीझोतात आला आहे. सिनेमातील त्याने साकारलेल्या रहमान डकैतच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे. 'धुरंधर'मधील अक्षय खन्नाचं एन्ट्री साँग आणि त्याचा स्वॅगही प्रचंड व्हायरल झाला आहे. पण, 'धुरंधर'च्या यशानंतर अक्षय खन्नाच्या डिमांड वाढल्या असून त्याने त्याच्या आगामी दृश्यम ३ सिनेमातून एक्झिट घेतली आहे. त्यानंतर आता बॉलिवूड अभिनेता अरशद वारसीने अक्षय खन्नाच्या विचित्र स्वभावाबाबत खुलासा केला आहे.
अरशद वारसीने अक्षय खन्नासोबत हलचल, शॉर्ट कट या सिनेमांमध्ये काम केलं आहे. द लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत अरशद वारसीने अक्षयच्या स्वभावाबाबत खुलासा केला. तो म्हणाला, "अक्षय खन्ना एक गंभीर व्यक्ती आहे. तो सुरुवातीपासूनच एक चांगला अभिनेता आहे. यामध्ये काहीच वाद नाही. पण, तो त्याच्याच धुंदीत असतो. त्याला तुमची काहीच पर्वा नसते. त्याला कोणाबद्दल काहीच फरक पडत नाही. त्याचं लाइफ वेगळं आहे. तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता, काय नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे. माझा नाही, असा त्याचा विचार असायचा. तो त्याचं आयुष्य त्याच्याप्रमाणे जगतो. त्याला पीआर वगैरेचीही काही गरज वाटत नाही. पहिल्यापासून तो असाच आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला अक्षय खन्ना छावा मुळे प्रसिद्धीझोतात आला होता. आता 'धुरंधर'मुळे त्याची चर्चा आहे. 'दृश्यम ३'मधून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण, 'धुरंधर'मुळे अक्षय खन्नाने त्याच्या फीमध्ये वाढ केली. त्यासोबतच सिनेमात विग लावण्याचा हट्टही केला. यामुळे निर्माते आणि त्याच्यात मतभेद झाल्याने अक्षय खन्नाने 'दृश्यम ३'मधून एक्झिट घेतली आहे. अक्षय खन्नानंतर जयदीप अहलावतला 'दृश्यम ३'मध्ये कास्ट करण्यात आलं आहे.