अर्शदने घेतला अक्षयचा बदला??

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2016 17:32 IST2016-08-18T12:02:10+5:302016-08-18T17:32:58+5:30

होय, एकार्थाने अर्शद वारसीने अक्षय कुमारचा बदलाच घेतला. जरा सविस्तर सांगायचेच तर, अक्षयने अर्शदकडून ‘जॉली एलएलबी2’ हिसकावला आणि आता ...

Arshad has taken the change? | अर्शदने घेतला अक्षयचा बदला??

अर्शदने घेतला अक्षयचा बदला??

>होय, एकार्थाने अर्शद वारसीने अक्षय कुमारचा बदलाच घेतला. जरा सविस्तर सांगायचेच तर, अक्षयने अर्शदकडून ‘जॉली एलएलबी2’ हिसकावला आणि आता अर्शदने अक्षयचा ‘आँखे२’ हिसकावून घेतला. ‘जॉली एलएलबी’मधील अर्शदचा अभियन चांगलाच वाखाणल्या गेला होता. त्यामुळे ‘जॉली एलएलबी’च्या सीक्वलमध्ये त्याचीच वर्णी लागणार, अशी अपेक्षा होती. पण ऐनवेळी  ‘जॉली एलएलबी’च्या सीक्वलमध्ये अर्शदऐवजी अक्षयची वर्णी लागली. ‘आँखे’च्या सीक्वलमध्ये नेमके याच्या ऊलट घडले. आजच ‘आँखे2’च्या स्टारकास्टची घोषणा करण्यात आली. या नव्या स्टारकास्टमध्ये अक्षयची जागा अर्शदने घेतली आहे. अर्शदच्या मते, हा निव्वळ योगायोग आहे. पण मित्रा,आम्ही तर याचा ‘फिट्टम फाट’ एवढेच म्हणू!!

Web Title: Arshad has taken the change?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.