रणवीर सिंगच्या 'धुरंधर' सिनेमातील अर्जुन रामपालचा लूक आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 18:50 IST2025-11-08T18:50:15+5:302025-11-08T18:50:47+5:30
'Dhurandhar Movie : 'धुरंधर' चित्रपटातील अभिनेता अर्जुन रामपालचा पहिला लूक समोर आला आहे आणि या लूकची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.

रणवीर सिंगच्या 'धुरंधर' सिनेमातील अर्जुन रामपालचा लूक आला समोर
'धुरंधर' चित्रपटातील अभिनेता अर्जुन रामपालचा पहिला लूक समोर आला आहे आणि या लूकची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. नुकतेच अभिनेता रणवीर सिंगने त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे नवीन पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर केले, ज्यात रामपालचा हटके अवतार दिसत आहे. छोटे केस, लांब दाढी, काळा चष्मा आणि सिगार अशा लूकमध्ये अर्जुन रामपाल दिसत असून, त्याची एनर्जी आणि डोळ्यातील तीव्र चमक स्पष्टपणे जाणवत आहे.
'धुरंधर' सिनेमातील अर्जुन रामपालचा लूक शेअर करत रणवीर सिंगने कॅप्शनमध्ये लिहिले, "मौत का फरिश्ता... काउंटडाउन सुरू, फक्त ४ दिवस बाकी." तसेच, चित्रपटाचा ट्रेलर १२ नोव्हेंबरला रिलीज होणार असल्याचेही त्याने सांगितले.
आदित्य धर यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला 'धुरंधर' हा चित्रपट कथितरित्या सत्य घटनांवर आधारित आहे. चित्रपटाची कथा सध्या गुप्त ठेवण्यात आली असली तरी, बातम्यांनुसार रणवीर यात अंडरकव्हर गुप्तहेराची भूमिका साकारत आहे, ज्याची कथा पाकिस्तानातील भारतीय एजंट्सचा पराक्रम दर्शवते. या स्टार-स्टडेड चित्रपटात संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
चित्रपट कधी रिलीज होणार?
चित्रपट 'धुरंधर' ५ डिसेंबर २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. तर ट्रेलर ४ दिवसांनी म्हणजे १२ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा टायटल ट्रॅक रिलीज करण्यात आला होता, ज्यामध्ये रणवीर सिंगचा दमदार लूक आणि उत्साह पाहण्यासारखा होता. जुलैमध्ये आलेल्या चित्रपटाच्या टीझरमध्ये संपूर्ण स्टारकास्टची झलक दाखवण्यात आली होती आणि या स्पाय थ्रिलर अॅक्शन चित्रपटात रणवीर सिंग, संजय दत्त, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना, आर. माधवन आणि सारा अर्जुन यांसारखे दिग्गज कलाकार दिसणार आहेत.