अरुण गवळी बघणार का अर्जुन रामपालचा 'डॅडी' ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2017 16:16 IST2017-07-04T10:42:46+5:302017-07-04T16:16:22+5:30
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या आयुष्यावर डॅडी हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. या चित्रपटात अर्जुन रामपाल अरुण गवळीची भूमिका ...

अरुण गवळी बघणार का अर्जुन रामपालचा 'डॅडी' ?
अ डरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या आयुष्यावर डॅडी हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. या चित्रपटात अर्जुन रामपाल अरुण गवळीची भूमिका साकारणार आहे. या रिलीज डेट एका आठवड्याने पुढे ढकलण्यात यावी अशी विनंती अरुण गवळीची मुलगी गीताने चित्रपटाच्या निर्मात्यांना केली आहे. गवळी कुटुंबीयांना एकत्र बसून हा चित्रपट बघायचा आहे. मुलगी गीताचे म्हणणे आहे हा चित्रपट आमच्यासाठी सहकुटुंब वडिलांसह बघणे हा अत्यंत भावनिक क्षण आहे. त्यामुळे अरुण गवळीला पुढच्या आठवड्यात पैरोल मंजूर होईल आणि सहकुटुंब आम्ही हा चित्रपट सिनेमागृहात बघू शकू. यासंदर्भात गीताने अर्जुन रामपालची ही भेट घेतली आहे. त्यावेळी ती म्हणाली, ''आपण हा चित्रपट मोठ्या पडद्यावर बघण्यास उत्सुक आहोत जर हा चित्रपट माझ्या बाबांसमोर रिलीज झाला तर या गोष्टीचा आम्हाला विशेष आनंद होईल. मी अशी इच्छा आहे की हा चित्रपट जुलैऐवजी सप्टेंबरमध्ये रिलीज करण्यात यावा. तोपर्यंत माझ्या बाबांचा पैरोल मंजूर होईल.'' एका कुख्यात डॉनच्या आयुष्यावर चित्रपट तयार केल्या असल्याने काही लोकांनी या गोष्टीची आलोचना देखील केली आहे. आधी हा चित्रपट 21 जुलै रिलीज करण्यात येणार होता मात्र आता 8 सप्टेंबरला रिलीज केला जाणार आहे. तसेच जर अरुण गवळीचा पैरोल मंजूर झाला तर तो पण सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट बघण्याची शक्यता आहे. याचित्रपटात अरुण गवळीची भूमिका साकारण्यासाठी अर्जुन रामपालने विशेष मेहनत घेतली आहे. असीम अहलुवालिया या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यात अरुण गवाळीचा गुन्हेगारी जग ते राजकारण असा प्रवास दाखविण्यात येणार आहे.