​अर्जुन रामपाल, जॅकी श्रॉफ बनणार ‘भाजप नेते’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2017 15:45 IST2017-01-10T15:45:50+5:302017-01-10T15:45:50+5:30

बॉलिवूड अभिनेते अर्जुन रामपाल आणि जॅकी श्रॉफ लवकरच  राजकीय नेत्याच्या भूमिकेत दिसू शकतात. पडद्यावर नाही तर रिअल लाईफमध्ये. होय, ...

Arjun Rampal, Jackie Shroff to become 'BJP leader' !! | ​अर्जुन रामपाल, जॅकी श्रॉफ बनणार ‘भाजप नेते’!!

​अर्जुन रामपाल, जॅकी श्रॉफ बनणार ‘भाजप नेते’!!

लिवूड अभिनेते अर्जुन रामपाल आणि जॅकी श्रॉफ लवकरच  राजकीय नेत्याच्या भूमिकेत दिसू शकतात. पडद्यावर नाही तर रिअल लाईफमध्ये. होय, अर्जुन रामपाल व जॅकी श्रॉफ दोघेही भाजपात प्रवेश करू शकतात. मंगळवारी अर्जुनने दिल्लीतील भाजपाच्या मुख्यालयी पक्षाचे जनरल सेक्रेटरी कैलाश विजयवर्गीय यांची भेट घेतली. यावेळी अर्जुनने राजकीय प्रवेशाच्या वृत्ताला दुजोरा दिला नसला तरी त्यास थेट नकारही दिला नाही. मी काही नेता नाही. राजकारण करण्यासाठी मी येथे आलेलो नाही. तर भाजपाला कसा पाठींबा देता येईल, हे ठरवण्यासाठी मी येथे आलोय. भाजपाने उभा केलेला उमेदवार योग्य आहे, असे मला वाटलेच तर मी त्याचा प्रचार करू शकतो,असे तो म्हणाला.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्जुनसह ५९ वर्षांचा अभिनेता जॅकी श्रॉफही भाजपात प्रवेश करू शकतो. त्यानेही अलीकडे भाजपा नेत्यांची भेट घेतली. हे दोघेही उत्तर प्रदेश व पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाचा प्रचार करू शकतात. एकंदर काय तर, अर्जुन रामपाल व जॅकी श्रॉफ दोघेही राजकारणाच्या वाटेवर चालणार, हे जवळपास निश्चित आहे. आता यात ते किती यशस्वी होतात आणि आपल्या लोकप्रीयतेच्या जोरावर भाजपाला किती मते मिळवून देतात, ते येत्या काळात दिसेलच. तोपर्यंत प्रतीक्षा ही आलीच.
काही दिवसांपूर्वी म्युझिक कम्पोझर साजिद-वाजिद यांनी अधिकृतपणे भाजपा प्रवेश केला.

येत्या फेबु्रवारी व मार्चमध्ये देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. यात उत्तर प्रदेश व पंजाब ही दोन राज्ये सर्वाधिक महत्त्वाची आहेत. प्रचारसभेत गर्दी खेचण्यासाठी अनेक पक्ष बॉलिवूड चेहºयांचा वापर करतात.

Web Title: Arjun Rampal, Jackie Shroff to become 'BJP leader' !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.