मलायका आधी अर्पिता खानसह रिलेशनशिपमध्ये होता अर्जुन कपूर, सलमान खानला समजताच घडले होते असे काही
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2020 16:37 IST2020-11-18T16:29:52+5:302020-11-18T16:37:43+5:30
अर्जुन आता सलमानचीच वहिनी मलायकासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. जरी त्या दोघांनी याबद्दल काहीही सांगितले नसले तरीही अप्रत्यक्षपणे दोघांनी त्यांच्या प्रेमाचीही कबुली दिली आहे. तर दुसरीकडे अर्पिताने अभिनेता आयुष शर्मासह रेशीमगाठीत अडकली असून तिचाही सुखी संसार सुरू आहे.

मलायका आधी अर्पिता खानसह रिलेशनशिपमध्ये होता अर्जुन कपूर, सलमान खानला समजताच घडले होते असे काही
अर्जुन कपूर सध्या छैय्या छैय्या गर्ल मलायका अरोरासह असलेल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असतो. अर्जुन कपूर त्याच्या सिनेमांपेक्षा अफेअरमुळेच जास्त चर्चेत असतो. अर्जुन कपूर मलायका आधी दबंग सलमान खानची बहीण अर्पिता खानसह रिलेशिपमध्ये होता. दोघेही 2 वर्ष एकमेकांना डेट करत होते.याबद्दल खुद्द अर्जुनही अर्पितासह असलेल्या त्याच्या प्रेमाची कबुली दिली होती. एका मुलाखती दरम्यानचा त्याचा जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला आहे.
अर्जुन म्हणाला होता, माझे पहिले प्रेम आणि पाहता क्षणी जिच्या प्रेमात पडलो ती फक्त अर्पिता खान होती.आम्ही दोघांनी वयाच्या 18 व्या वर्षी डेटिंगला सुरुवात केली आणि ते 2 वर्षे टिकले. मी आधीपासूनच सलमान भाईच्या संपर्कात असायचो. 'मैंने प्यार क्यों किया' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान आमच्या नात्याची सुरुवात झाली होती.
मला सलमान भाईची खूप भीती वाटत होती. मी त्याला आणि संपूर्ण कुटुंबास सांगायला गेलो कारण त्यांना हे प्रथम माझ्या तोंडून ऐकायचे होते. ते लोक खूप चांगले आहेत. सलमान स्तब्ध झाला होता पण तो लोकांच्या नात्याचा आदर करतो. सत्य हे आहे की त्या नात्यात त्याने मला खूप सपोर्टही केला होता. मात्र काही कारणामुळे या दोघांचे नाते फार काळ टिकले नाही. नात्यात दुरावा आला आणि दोघांचेही ब्रेकअप झाले.
अर्जुन आता सलमानचीच वहिनी मलायकासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. जरी त्या दोघांनी याबद्दल काहीही सांगितले नसले तरीही अप्रत्यक्षपणे दोघांनी त्यांच्या प्रेमाचीही कबुली दिली आहे. तर दुसरीकडे अर्पिताने अभिनेता आयुष शर्मासह रेशीमगाठीत अडकली असून तिचाही सुखी संसार सुरू आहे. अर्पिताला दोन मुलांची आई आहे.
अरबाजसह काडीमोड घेऊ नये असं अनेकांनी मलायकाला सुचवलं होतं असंही मलायकाने सांगितलं. मात्र काडीमोड घेण्याचा आपला निर्णय झाला होता आणि या निर्णयामुळे खूश आहे असंही तिने म्हटलं आहे. जे काही झालं चांगलंच झालं हे सांगायलाही ती विसरली नाही. सारं विसरून जीवनात पुढे जाताना ज्याच्यासोबत तुमचं चांगलं नातं निर्माण व्हावं असा एक चांगला मित्र आणि जोडीदार असावा, तसं झाल्यास तुम्ही नशीबवान असता. जीवनात आनंदी राहण्याची दुसरी संधी मिळाली असं समजावं असं सांगत मलायकाने अर्जुनसोबतच्या चांगल्या संबंधांची अप्रत्यक्ष कबुलीच दिली होती.