​अरिजित का गातोय पुन्हा ‘इश्क मुबारक’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2016 10:39 IST2016-10-22T10:39:54+5:302016-10-22T10:39:54+5:30

प्रत्येक गाणे परफेक्ट व्हावे असा त्याचा प्रयत्न असतो. म्हणून मग आम्ही गाणे पुन्हा रेकॉर्ड करण्याचा निर्णय घेतला.

Arizit's song again 'Ishq Mubarak'? | ​अरिजित का गातोय पुन्हा ‘इश्क मुबारक’?

​अरिजित का गातोय पुन्हा ‘इश्क मुबारक’?

ंगिंग सेन्सेशन अरिजित सिंगच्या आवाजाने तर संपूर्ण देश घायाळ आहे. सिनेमाचे संगीत हीट करायचे तर, अल्बममध्ये एक तरी अरिजितचे गाणे पाहिजे, असा जणू सध्या इंडस्ट्रीमध्ये ट्रेंडच आला आहे. त्याप्रमाणे आगामी ‘तुम बीन २’ चित्रपटामध्ये त्याने रोमॅण्टिक ट्रॅक गायिले.

‘इश्क मुबारक’ हे गाणे जसे लाँच करण्यात आले तसे चाहत्यांनी ते डोक्यावर घेतले. त्याच्या आवाजाची जादू पुन्हा एकदा खरी ठरली. परंतु ते गाणे ऐकून एक व्यक्ती खूश नव्हता. आता अरिजितचे गाणे न आवडणारा कोण असू शकतो, असा जर तुम्ही विचार करत असाल तर वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

दस्तुरखुद्द अरिजितलाच हे गाणे म्हणावे तितके आवडले नाही. त्यामुळे त्याने दिग्दर्शक अनुभव सिन्हाला तसे फोन करून कळवले आणि पुन्हा एकदा रेकॉर्ड करण्याची विनंती केली. याविषयी अनुभवने सांगितले की, ‘अरिजित म्हणाला, गाण्याच्या व्हिडिओप्रमाणे माझा आवाज परफेक्ट वाटत नाही. आपण पुन्हा एकदा रेकॉर्ड करूया.’

Arijit
सिंगिंग सेन्सेशन :अरिजित सिंग

अनुभव पुढे सांगतो की, ‘त्याच्या टॅलेंटवर कोणालाच शंका घेण्याची गरज नाही. प्रत्येक गाणे परफेक्ट व्हावे असा त्याचा प्रयत्न असतो. म्हणून मग आम्ही गाणे पुन्हा रेकॉर्ड करण्याचा निर्णय घेतला. मला सांगायला आनंद होतोय की, पहिल्यापेक्षा हे नवे व्हर्जन अधिक चांगले आहे. खरंच मानले अरिजितला!

अंकित तिवारीने क म्पोझ केलेले हे गाणे स्कॉटलंडच्या सुंदर लोकेशन्सवर चित्रित करण्यात आलेले आहे. गाण्याचा व्हिडिओ तोच राहिल, फक्त गाण्याची स्टाईल थोडी वेगळी असेल. 

Web Title: Arizit's song again 'Ishq Mubarak'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.