मुकेश अंबानींचं 'अँटिलिया' आतून कसं आहे? तिथं काम करणाऱ्या शेफनेनं केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 11:58 IST2025-11-23T11:26:36+5:302025-11-23T11:58:27+5:30
शेफच्या नजरेतून 'अँटिलिया', अंबानींच्या १५,००० कोटींच्या घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा अनुभव काय?

मुकेश अंबानींचं 'अँटिलिया' आतून कसं आहे? तिथं काम करणाऱ्या शेफनेनं केला खुलासा
उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचं मुंबईतील आलिशान निवासस्थान 'अँटिलिया' हे नेहमीच देशातील आणि जगातील आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. या भव्य घराची आतील रचना आणि अत्याधुनिक सुविधांबद्दल सर्वसामान्यांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत मोठी उत्सुकता असते. अशातच, 'अँटिलिया'च्या आतील गोष्टींबद्दल खास माहिती समोर आली आहे. 'अँटिलिया' काम करणाऱ्या एका शेफनं अभिनेत्री अर्चना पूरण सिंग यांच्याशी बोलताना खास खुलासा केला.
नुकतंच अर्चना पूरण सिंग, त्यांचे पती परमीत सेठी आणि दोन मुलांनी दिल्लीला भेट दिली. यावेळी त्यांनी दिल्लीतील अस्सल स्ट्रीट फूडचा आस्वाद घेतला. दिल्लीतील खाद्यभ्रमंतीदरम्यान अर्चना यांची भेट एका स्वयंपाकीशी झाली, ज्याने अंबानींच्या घरी स्वयंपाक केला होता.
स्वयंपाक्याने सांगितले की, तो तब्बल एक महिना अंबानींच्या 'अँटिलिया' या घरात राहत होता आणि त्यांच्यासाठी स्वयंपाक करत होता. हे ऐकून अर्चना यांनी त्याला लगेच उत्साहाने विचारले, "भाऊ, आत कसं आहे?". अंबानींच्या १५ हजार कोटींच्या घराचे सिक्रेट जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या अर्चनाला शेफने मात्र अगदी साधे उत्तर दिले. तो म्हणाला, "ठीक आहे". त्या शेफनं सांगितलं की त्यानं फक्त मुकेश अंबानी यांच्या घरीच नाही तर या शाहरुख खान, सलमान खान यांच्या कुटुंबासाठी स्वयंपाक केला होता.
दरम्यान, मुकेश अंबानींच्या 'अँटिलिया' या घराला जगातील सर्वात महागडं घर म्हटलं जातं. येथे छोट्या-मोठ्या सगळ्या सुविधा आहेत. रिपोर्ट्सनुसार, मुकेश अंबानींच्या 'अँटिलिया'ची किंमत सुमारे १५,००० कोटी आहे. त्यात तीन हेलिपॅड, १६८ कारसाठी पार्किंग, एक मंदिर, स्पा, आईस्क्रीम पार्लर आणि स्नो रूम (कृत्रिम बर्फाची खोली) अशा आलिशान सुविधा आहेत. ते ८.० तीव्रतेच्या भूकंपाचा सामना करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.