​अरबाज-मलायकामधील ‘दुरावा’ कायम; लवकरच घटस्फोट??

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2016 20:56 IST2016-08-17T12:01:50+5:302016-08-17T20:56:26+5:30

अरबाज खान आणि त्याची हॉट अ‍ॅण्ड हॉटेस्ट पत्नी मलायका अरोरा खान या जोडीने परस्परांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा ...

Arbaaz-Malaika's 'Durava' forever; Divorce soon ?? | ​अरबाज-मलायकामधील ‘दुरावा’ कायम; लवकरच घटस्फोट??

​अरबाज-मलायकामधील ‘दुरावा’ कायम; लवकरच घटस्फोट??

बाज खान आणि त्याची हॉट अ‍ॅण्ड हॉटेस्ट पत्नी मलायका अरोरा खान या जोडीने परस्परांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. पण कालांतराने या दोघांनी काही काळ ‘ब्रेक’ घेतल्याचे समोर आले. अलीकडे अरबाज व मलायका एकत्र दिसले. मग ते ईद सेलिब्रेशन असो वा अरबाजचा वाढदिवस. यावरून अरबाज व मलायका पुन्हा एकत्र आलेत, असेच सर्वांना वाटले. पण तसे नाहीय.  खुद्द अरबाजनेच एका इंग्रजी पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत आम्ही वेगळ झालो असल्याची कबूली दिली. जानेवारीच्या अखेर अरबाज आणि मलायका  यांच्या घटस्फोटाच्या बातम्या आल्या होत्या. दोघांनी आपले १७ वर्षे जूने नाते संपवण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त माध्यमात झळकत होते. मात्र, मार्चच्या अखेरपर्यंत त्यांनी यावर मौन बाळगले होते. मात्र आज अरबाज खानने आम्ही वेगळ झालो असल्याची कबूली दिली. आम्ही दोघे सध्या एकत्र राहत नाही, लवकरच घटस्फोट घेतला जाईल,असे  त्याने सांगितले.
मागील सहा महिन्यांपासून मलायका अरबाजपासून वेगळी राहत आहे. ती खारमधील भाड्याच्या घरात मुलगा अरहानसोबत राहत आहे. त्याच अपार्टमेंटमध्ये मलायकाची बहीण अमृता राहते; मात्र मलायका तिच्याकडे राहत नाही. अमृताने वाढदिवसानिमित्त दुबईत दिलेल्या पाटीर्लाही मलायका गेली नव्हती. या पाटीर्ला अरबाज उपस्थित होता. नणंद अर्पिताच्या डोहाळे जेवणालाही मलायका गैरहजर राहिली होती.
५ वर्ष एकमेंकाच्या प्रेमात अखंड बुडाल्यानंतर १२ डिसेंबर १९९८ रोजी मलायका व अरबाज लग्नाच्या बंधनात अडकले होते. १८ वर्षांमध्ये त्या दोघांमध्ये खटके उडाल्याचे ऐकिवात नव्हते. अलीकडे ते दोघे पॉवर कपल या रि?लिटी शोचे सूत्रसंचालन करत होते; मात्र जेमतेम तीन भागच ते एकत्र होते. शोसाठी येताना दोघेही वेगवेगळ्या गाडीतून येत असत. त्या वेळी या दोघांमध्ये खटके उडाल्याची चर्चा होती.
सलीम खान आणि सलमान खान यांनीही दोघात तडजोड करण्याचा प्रयत्न केला होता.



































































  

Web Title: Arbaaz-Malaika's 'Durava' forever; Divorce soon ??

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.