अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया सोशल मीडियावर पुन्हा होतेय ट्रेंड, समुद्र किनाऱ्याजवळील फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2021 19:00 IST2021-01-14T19:00:00+5:302021-01-14T19:00:03+5:30
अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रियानी सोशल मीडियावर सध्या ट्रेंडमध्ये आहे.

अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया सोशल मीडियावर पुन्हा होतेय ट्रेंड, समुद्र किनाऱ्याजवळील फोटो व्हायरल
अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रियानी सोशल मीडियावर सध्या ट्रेंडमध्ये आहे. तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत जे जोरदार व्हायरल होतायेत. या फोटोंमध्ये ती समुद्राच्या किनारी उभी दिसतेय. फोटोंंसोबत तिने काही व्हिडीओ देखील शेअर केले आहेत. समुद्राच्या किनारी उभी राहून तुझी वाट बघताना असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.
लॉकडाऊनमध्ये जॉर्जिया आणि अरबाज खान एकत्र राहिले होते. अरबाज सोबत मस्ती करतानाचे फोटो आणि व्हिडीओ तिने शेअर करत असते. मलायका अरोरासोबत घटस्फोट घेतल्यापासून अरबाज खान इटालियन मॉडेल आणि अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानीला डेट करतो आहे. दोघे एकमेकांसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करताना दिसतात.
जॉर्जिया अरबाज पेक्षा 22 वर्षांनी लहान आहे. वयात इतकं अंतर असताना ही दोघे एकमेकांसोबत खुश आहेत. अनेक सर्वाजनिक ठिकाणी दोघ एकत्र स्पॉट झाले आहेत. जॉर्जिया एंड्रियानी इटालियन मॉडेल, नर्तिका व अभिनेत्री आहे. फॅशन जगतात तिचे खूप मोठे नाव आहे. तिने ३०हून अधिक फॅशन शो केले आहेत आणि सर्वोत्कृष्ट फॅशन आयकॉनमध्ये तिचे नाव आहे.