सावत्र बहिणीला हॉस्पिटलमध्ये बघायला गेला अरबाज-मलायकाचा लेक, अरहानपेक्षा २२ वर्षांनी आहे लहान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 12:52 IST2025-10-06T12:49:44+5:302025-10-06T12:52:51+5:30
अरबाजचा लेक अरहानही आपल्या छोट्या बहिणीला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेला होता. याचा व्हिडीओ समोर आला आहे.

सावत्र बहिणीला हॉस्पिटलमध्ये बघायला गेला अरबाज-मलायकाचा लेक, अरहानपेक्षा २२ वर्षांनी आहे लहान
बॉलिवूड अभिनेता अरबाज खान दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. रविवारी(५ ऑक्टोबर) अरबाजची दुसरी पत्नी शूराने गोंडस बाळाला जन्म दिला. खान कुटुंबीयांच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं आहे. अरबाज आणि शूराला कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे. घरात लक्ष्मी आल्याने खान कुटुंबीय आनंदी आहेत. तर अरबाजचा लेक अरहानही आपल्या छोट्या बहिणीला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेला होता. याचा व्हिडीओ समोर आला आहे.
डिलिव्हरीनंतर शूरा खान आणि चिमुकलीची प्रकृती छान आहे. खान कुटुंबीय नव्या पाहुण्याला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये हजेरी लावत आहेत. अरबाज आणि मलायकाचा लेक अरहानदेखील आपल्या सावत्र बहिणीला बघण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेला होता. इन्स्टंट बॉलिवूड या पापाराझी पेजवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये त्याला स्पॉट करण्यात आलं आहे. अरबाजची मुलगी ही अरहानपेक्षा २२ वर्षांनी लहान आहे.
अरबाज आणि मलायकाने १९९९ मध्ये लग्न केलं होतं. त्यानंतर २००२ मध्ये मलायकाने अरहानला जन्म दिला होता. अरहान आता २२ वर्षांचा आहे. २०१७मध्ये अरबाज आणि मलायका घटस्फोट घेत वेगळे झाले होते. त्यानंतर अरबाजने २०२३ मध्ये शूरासोबत निकाह केला होता. त्या दोघांमध्ये २२ वर्षाचं अंतर आहे. आता अरबाज ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला आहे.