ए.आर. रहमान पुन्हा एकदा आॅस्करच्या शर्यतीत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2016 17:39 IST2016-12-14T14:46:21+5:302016-12-14T17:39:03+5:30
दोन ‘आॅस्कर’वर आपले नाव कोरणारा भारतीय संगीतप्रेमींच्या गळ्यातील ताईत संगीतकार ए.आर. रहमान पुन्हा एकदा आॅस्करच्या शर्यतीत आहे. ‘ पेले ...
.jpg)
ए.आर. रहमान पुन्हा एकदा आॅस्करच्या शर्यतीत...
द न ‘आॅस्कर’वर आपले नाव कोरणारा भारतीय संगीतप्रेमींच्या गळ्यातील ताईत संगीतकार ए.आर. रहमान पुन्हा एकदा आॅस्करच्या शर्यतीत आहे. ‘ पेले : द बर्थ आॅफ अ लिजंड’ या चित्रपटाला दिलेल्या संगीतासाठी रहमानला आॅस्कर पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे.
सन २००९ मध्ये डॅनी बॉयलच्या ‘स्लमडॉग मिलियनेयर’साठी रहमानने त्याच्या पहिल्यावहिल्या गोल्डन ग्लोब पुरस्कारासह दोन आॅस्कर पुरस्कारांवर आपले नाव कोरले होते. आता यंदाच्या ८९ व्या अॅकॅडमी पुरस्कारांच्या ओरिजनल स्कोअर गटात रहमानला नामांकन देण्यात आले आहे. ‘पेले: द बर्थ आॅफ अ लिजंड’ या चित्रपटाबरोबरच रहमानच्या ‘जिंगा’ या गीतालाही आॅस्करच्या शर्यतीत नामांकन मिळाले आहे. ‘पेले: द बर्थ आॅफ अ लिजंड’ हा सुप्रसिद्ध फुटबॉलपटू पेले याच्या आयुष्यावर बेतलेला चित्रपट अर्थात बायोपिक आहे.
अॅकेडमी आॅफ मोशन पिक्चर आर्ट्स अॅण्ड सायन्सेसने आज मंगळवारी (१४ डिसेंबर) आपल्या अधिकृत संकेतस्थळावर ही यादी जाहिर केली. ८९ व्या अॅकॅडमी अवार्डसाठीच्या अंतिम नामांकनाची घोषणा येत्या २४ जानेवारीला केली जाईल. यानंतर २६ फेबु्रवारीला हॉलिवूडमध्ये ‘हॉलिवूड अॅण्ड हायलँड सेंटर’च्या डोल्बी थिएटरमध्ये आॅस्कर पुरस्कार वितरण सोहळा रंगेल.
![]()
अल्लाह रक्खा रहमान हे ए. आर. रहमानचे पूर्ण नाव. आपल्या काळामधील सर्वश्रेष्ठ संगीतकार मानल्या जात असलेल्या रहमानने आजवर अनेक भाषांमधील चित्रपटांना संगीत देऊन जगभरातील चाहत्यांची मने जिंकली आहेत. रोजा, बॉम्बे, रंगीला, दिल से, लगान, रंग दे बसंती हे त्यांचे काही उल्लेखनीय चित्रपट आहेत. दोन आॅस्करसह, दोन ग्रॅमी पुरस्कार, एक बाफ्टा पुरस्कार, एक गोल्डन ग्लोब पुरस्कार, चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, १५ फिल्मफेअर पुरस्कार व १३ फिल्मफेअर असे अनेक पुरस्कार त्याने पटकावले आहेत. आजवरच्या त्याच्या दोन दशकांच्या कारकिर्दीत त्याला भारतीय संगीताला नवी ओळख दिल्याचे श्रेय दिले जाते.