पब्लिसिटी स्टंटसाठी काहीही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2016 15:00 IST2016-01-16T01:20:46+5:302016-01-24T15:00:59+5:30
काही दिवसांपूर्वी कोंकणा सेन शर्मा आणि रणबीर शौरी यांच्यातील बेबनावचे वृत्त समोर आले, तर प्रसिद्धी माध्यमांच्या एका बाजूने त्याला ...

पब्लिसिटी स्टंटसाठी काहीही...
क ही दिवसांपूर्वी कोंकणा सेन शर्मा आणि रणबीर शौरी यांच्यातील बेबनावचे वृत्त समोर आले, तर प्रसिद्धी माध्यमांच्या एका बाजूने त्याला पब्लिसिटी स्टंट म्हटले. असा अंदाज होता की, कोंकणाचा नवा चित्रपट 'तलवार' प्रदर्शित होणार आहे. यामध्ये किती तथ्य आहे हा एक वादाचा मुद्दा होऊ शकतो. कोंकणा-रणबीरच्या बेबनावाच्या मुद्दय़ांवरुन काही अशाच गोष्टींची आठवण नक्की येते, ज्यांच्यामुळेअशा शक्यता खर्या ठरल्या की हे सर्वपब्लिसिटीसाठी केले गेले. अशा गोष्टींमध्ये दोन प्रकारचे वृत्त प्रसिद्धी माध्यमांमध्ये येते. एक तर अफेयर किंवा ब्रेक अपचे आणि मग हे समजण्यास वेळ लागत नाही की हे वृत्त चित्रपटाच्या पब्लिसिटीचा भाग आहे. या प्रकारच्या क्रेजी पब्लिसिटी स्टंटपासून खान स्टारदेखील दूर राहिलेले नाही. सलमान खान आणि शाहरुख आता पुन्हा मित्र झाले, मात्र त्यांच्यातील वादाचा काळ आठवला तर त्यांच्यापैकी कुणाचा चित्रपट प्रदर्शित होणार असेल त्या दोघांमधील कोणतेतरी भडक वृत्त समोर आणले जाते. इतकेच नव्हे ईदला दोघांनी गळा भेट घेतली तर त्याला सलमान खानच्या चित्रपटाच्या पब्लिसिटीशी जोडले गेले. 'गजिनी' प्रदर्शित होणार होता, तर अमीर खान अचानक ब्लॉग लिहू लागला. त्याने एका कुत्र्याचा उल्लेख केला, ज्याचे नाव होते शाहरुखखान. शाहरुखखानच्या 'रब ने बना दी जोड.ी' आणि क्रिसमसला 'गजिनी' प्रदर्शित होणार होता. ज्यावेळी 'रावण' प्रदर्शित होणार होता, तर अचानकपणे प्रियंका चोप्रा सोबतशाहरुखखानच्या अफेयरची चर्चा होऊ लागली.
एक किस्सा तर असा झाला, दूरचित्रवाणीवरील जस्सी मोना सिंहची एक न्यूड एमएमएस क्लिपिंग अचानक वायरल झाली. त्यामुळे माध्यमांसमोर तिचे बॉयफ्रेण्ड विद्युत जमाल समोर आले. या प्रकारानंतर अभिनेता म्हणून विद्युतचा 'कमांडो' हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. आपल्या गर्लफ्रेण्डसोबतच्या एमएमएसबाबत खुलासा देण्यासाठी माध्यमांसमोर आलेले विद्युत केवळ आपल्या येणार्या चित्रपटांबाबतच बोलताना दिसले. दाक्षिणात्य अभिनेता नागार्जून-मनीषा कोईराला या जोडीला घेऊन तयार झालेल्या महेशभट्ट यांच्या क्रिमिनल चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या एक दिवस अगोदर मुंबईच्या एका वृत्तपत्रात मनीषा कार अपघातात ठार झाल्याचे वृत्त छापून आले, ज्यामुळे वाद होणे साहजिकच होते. नंतर महेशभट्ट यांनी मान्य केले की, हे वृत्त चित्रपटाच्या पब्लिसिटीसाठी छापले गेले होते.