Anything for movie promotion
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2016 04:39 IST2016-02-24T11:39:06+5:302016-02-24T04:39:06+5:30
चित्रपटाचे शेड्यूल आणि दिग्दर्शकाच्या डिमांडनुसार, शॉट्स दिले की, कलावंतांचे काम संपले असे आता होत नाही. शूटिंग पूर्ण झाले की ...

Anything for movie promotion
चित्रपटाचे शेड्यूल आणि दिग्दर्शकाच्या डिमांडनुसार, शॉट्स दिले की, कलावंतांचे काम संपले असे आता होत नाही. शूटिंग पूर्ण झाले की लगेच प्रमोशनच्या कामाला लागावे लागते. अभिनेत्यांनी वेळ नसल्याचे कारण सांगून यातून पळवाट शोधू नये म्हणून निर्माता-दिग्दर्शक त्या कलावंतांच्या कॉन्ट्रॅक्टमध्येच तसे नमूद करीत असतात इतके या प्रमोशनला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. येणाºया चित्रपटाकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधता यावे, यासाठी मग प्रमोशनचे विविध फंडे वापरले जात आहेत. या क्रमात कुणी थेट बॉक्सरच्या रूपात रिंगमध्ये हात आजमावत आहे तर कुणी वेश बदलून देशाच्या परिक्रमेवर जाऊन आला आहे. अर्जून कपूर-करिना कपूर यांच्या आगामी की अॅण्ड का या चित्रपटाच्या एका गाण्यात अर्जूनने हायहिल्स घालून डान्स केला आहे. हायहिल्समधले अर्जूनचे पोस्टर्स आणि त्याच्या ट्रेलरचे दृश्य प्रमोशनसाठी वापरले जात आहेत. याआधीही अनेक स्टार्सनी आपल्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी वेगवेगळ्या क्लृत्या वापरल्या आहेत. त्यावर एक नजर...
प्रेम रतन धन पायो
कथा दमदार नसूनही बॉक्स आॅफिसवर मोठी कमाई करणाºया प्रेम रतन धन पायो या चित्रपटाचे अगदी जोरदार प्रमोशन करण्यात आले. राजश्री प्रोडक्शन तसेही या कामात मास्टर आहे. त्यांनी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सलमान खानच होस्ट करीत असलेल्या बिग बॉस या शोचा आधार घेतला. चित्रपटाची संूपर्ण टीम ऐन दिवाळीच्या दिवसात या शोमध्ये आली. घरी साधा चहाही न बनवणाºया सलमान, सोनम आणि नील नितीन मुकेश यांनी या शोमध्ये चक्क किचन गाठून स्वयंपाक केला. आहे की नाही एनिथिंग फॉर मुव्ही प्रमोशन...?
साला खडूस
आर. माधवनचा डिफरंट लूक आणि हृदयस्पर्शी अभिनयामुळे गाजलेल्या साला खडूस या चित्रपटाची कथा झोपडपट्टीत राहणाºया एका गरीब मुलीवर आधारित होती. ही मुलगी दारिद्रयाशी संघर्ष करीत असतानाही यशस्वी बॉक्सर होण्याचे स्वप्न पाहते आणि तिला या तिच्या गंतव्यावर पोहोचविण्यासाठी आर. माधवन तिला मदत करतो,अशी या चित्रपटाची कथा होती. म्हणूनच या चित्रपटासाठी खरीखूरी बॉक्सर नायिका निवडण्यात आली. रितिका सिंग असे तिचे नाव. रितिकाने या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी स्वत: रिंगमध्ये उतरून प्रतिस्पर्ध्याला जोरदार ठोसे लगावले.
मस्तीजादे
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मस्तीजादे या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तर वीर दास या कलावंतांने गहजबच केला. अंगावर एकही कपडे नसताना तो धावतोय असे त्याचे फोटो व्हायरल झाले. हे दृश्य साकारताना तो खरच नैसर्गिक अवस्थेत होता की कसे हे माहीत नाही. परंतु त्याचे तसले फोटो मात्र खूप गाजले. प्रमोशनचा हा जगावेगळा फंडा मात्र जोरदार चर्चेत राहिला.
पिपली लाईव्ह
महगाई डायन खाये जात हैं....या गाण्यामुळे विशेष गाजलेल्या आमिर खानच्या पिपली लाईव्ह या चित्रपटाचे प्रमोशनही असेच भन्नाट झाले. आमिरने या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चक्क आपले रूपडे बदलून देशभरातील सात शहरांना भेटी दिल्या. विशेष म्हणजे, त्याचा गेटअप इतका वेगळा होता की या शहरातील त्याच्या चाहत्यांनाही हा आमिर आहे हे ओळखता आले नाही. परंतु त्याच्या या प्रमोशनल अॅक्टिव्हिटीचा खूप फायदा झाला आणि देशभरातील मीडियाने या चित्रपटाला जोरदार प्रमोट केले.