सिनेमामध्ये येण्यापूर्वी 'हे' काम करायची देवसेना, 'बाहुबली'सोबत अनेक वर्ष होती अफेयरची चर्चा

By गीतांजली | Updated: November 4, 2020 15:07 IST2020-11-04T14:04:47+5:302020-11-04T15:07:33+5:30

अनुष्काने २००५ साली तेलुगू चित्रपट 'सुपर'मधून पदार्पण केले होते.

Anushka shetty know about baahubali actress personal life and affair with prabhas | सिनेमामध्ये येण्यापूर्वी 'हे' काम करायची देवसेना, 'बाहुबली'सोबत अनेक वर्ष होती अफेयरची चर्चा

सिनेमामध्ये येण्यापूर्वी 'हे' काम करायची देवसेना, 'बाहुबली'सोबत अनेक वर्ष होती अफेयरची चर्चा

दक्षिण भारतीय चित्रपटातील अभिनेत्री अनुष्का शेट्टीला खूप फॅन फॉलोव्हिंग आहे. अनुष्काचे खरं नाव स्वीटी शेट्टी आहे त्यानंतर तिने नाव बदलून अनुष्का केले. अनुष्काने 2005मध्ये 'सुपर' सिनेमातून डेब्यू केला होता. तिच्या कुटुंबातील कोणीही चित्रपटसृष्टीतील नाही. तरीही आज अनुष्काने तिच्या मेहनतीच्या जोरावर यश मिळवले आहे. सिनेमात येण्याआधी अनुष्का खूपच फिट होती यामागील कारण तिचे प्रोफेशन होते. 

अभिनयात येणाऱ्या पूर्वी अनुष्का मंगळुरुमध्ये एका योगा ट्रेनर होती. अनुष्काचं सौंदर्य पाहून तिला एका दिग्दर्शकाने चित्रपटाची ऑफर दिली होती. अनुष्काने २००५ साली तेलुगू चित्रपट 'सुपर'मधून पदार्पण केले होते.

या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व आयशा टाकिया मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात तिची सपोर्टिंग भूमिका होती. यातील तिच्या कामाचं खूप कौतूक झालं होतं.  यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. तिने अनेक तेलुगू सिनेमांमध्ये काम केले. अनुष्काचा सर्वात सुपरडूपर हिट सिनेमा ठरला 'बाहुबली 2'. ‘बाहुबली2’नंतर प्रभास व अनुष्काच्या लिंकअपच्या बातम्या पसरल्या होत्या. या बातम्या अद्यापही थांबलेल्या नाहीत. आता तर दोघेही लग्न करणार, इथपर्यंत चर्चा रंगली होती.

अनुष्काने बाहुबली या सिनेमासह विक्रमारकुडू, अरुंधती, वेदम, रुद्रमादेवी, सिंघम सीरीज अशा सुपरहिट सिनेमांमध्ये काम केले आहे.
 

Web Title: Anushka shetty know about baahubali actress personal life and affair with prabhas