अंगाचा थरकाप उडवणारा आहे अनुष्का शर्माच्या ‘परी’चा नवा टीजर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 15:43 IST2018-02-02T10:13:01+5:302018-02-02T15:43:01+5:30
या वर्षात रिलीज होणा-या अनुष्का शर्माच्या ‘परी’ या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरली आहे. याचे सगळ्यांत मोठे कारण आहे, या चित्रपटाचा विषय.

अंगाचा थरकाप उडवणारा आहे अनुष्का शर्माच्या ‘परी’चा नवा टीजर!
य वर्षात रिलीज होणाºया अनुष्का शर्माच्या ‘परी’ या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरली आहे. याचे सगळ्यांत मोठे कारण आहे, या चित्रपटाचा विषय. बॉलिवूडच्या आघाडीच्या सर्व अभिनेत्री एकीकडे रोमॅन्टिक चित्रपट करण्यात बिझी असताना अनुष्काने मात्र आपल्यासाठी एक हॉरर चित्रपट निवडला आहे. अनुष्काचीच निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे नवा टीजर त्यामुळेच बघण्यासारखा आहे. हा टीजर तुमचा थरकाप उडवल्याशिवाय राहणार नाही. टीजरमध्ये अनुष्का बेडवर बसून टीव्हीवर कार्टुन बघतेय...तिच्या चेहºयावर हास्य आहे. पण अचानक कॅमेरा तिच्या पायांकडे सरकतो आणि हा टीजर बघणारा प्रत्येक जण हादरतो. अनुष्काचे हात साखळदंडांनी बांधलेले आहेत. पायातही बेड्या आहेत. तिच्या या रक्ताळलेल्या पायांवर क्षणभर कॅमेरा थांबतो आणि मग अचानक तिच्या पायाच्या बोटांची नखे हळूहळू वाढू लागलेली दिसतात. She will grow on you... असे लिहून अनुष्काने हा टीजर चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
अनुष्का या चित्रपटाची को-प्रोड्यूसर आहे. अनुष्का तिचा भाऊ करनेश शर्मासोबत हा चित्रपट बनवते आहे. प्रोसित रॉय या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. बंगाली स्टार परमब्रता चॅटर्जी यात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. यापूर्वी अनुष्का निर्मित ‘एनएच१०’ आणि ‘फिल्लोरी’ हे दोन चित्रपट आपण पाहिलेत. या दोन्ही चित्रपटांना पे्रक्षक व समीक्षकांची दाद मिळाली. आता अनुष्काच्या होम प्रॉडक्शनचा तिसरा सिनेमा ‘परी’कडूनही प्रेक्षकांना बºयाच अपेक्षा आहेत. अनुष्का या अपेक्षांवर किती खरी उतरते तेही आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे. तूर्तास अनुष्का ‘परी’च्या शूटींगसोबतच आनंद एल राय दिग्दर्शित ‘झिरो’ या चित्रपटाच्या शूटींगमध्येही व्यस्त आहे. यात ती शाहरूख खान आणि कॅटरिना कैफसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय प्रदर्शनाच्या वाटेवर असलेल्या संजय दत्तच्या बायोपिकमध्येही अनुष्का एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारतेय. गत डिसेंबर महिन्यात अनुष्काने क्रिकेटपटू विराट कोहलीसोबत लग्न केले. ‘परी’ हा अनुष्काचा लग्नानंतरचा प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट असणार आहे.
ALSO READ : अनुष्का शर्माच्या ‘परी’च्या टीजरने उडविला थरकाप; तर पोस्टर बघून फुटेल घाम!