अनुष्का शर्माचा भाऊ कर्णेश शर्मा आणि तृप्ती डिमरीचं ब्रेकअप?, इंस्टाग्रामवर एकमेकांना केलं अनफॉलो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 10:25 AM2023-07-01T10:25:30+5:302023-07-01T10:25:49+5:30

Tripti Dimri-Karnesh Ssharma: तृप्ती डिमरी आणि अनुष्का शर्माचा भाऊ कर्णेश शर्मा यांच्या डेटींगची अनेक दिवसांपासून चर्चा होती. पण आता दोघेही वेगळे झाल्याचे दिसत आहे.

Anushka Sharma's brother Karnesh Sharma and Tripti Dimri broke up?, unfollowed each other on Instagram | अनुष्का शर्माचा भाऊ कर्णेश शर्मा आणि तृप्ती डिमरीचं ब्रेकअप?, इंस्टाग्रामवर एकमेकांना केलं अनफॉलो

अनुष्का शर्माचा भाऊ कर्णेश शर्मा आणि तृप्ती डिमरीचं ब्रेकअप?, इंस्टाग्रामवर एकमेकांना केलं अनफॉलो

googlenewsNext

'बुलबुल' फेम अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri) आणि अनुष्का शर्मा(Anushka Sharma)चा भाऊ कर्णेश शर्मा (Karnesh Ssharma) यांच्या रिलेशनशीपची चर्चा अनेक दिवसांपासून होती. दोघांनीही या वृत्तांची पुष्टी केली नव्हती, परंतु दोघांनीही अनेकदा त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एकमेकांचे फोटो शेअर केले आहेत. तृप्तीने कर्णेशच्या प्रोडक्शन हाऊसच्या 'बुलबुल' आणि 'काला' या दोन चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता दोघांचे ब्रेकअप झाले असल्याचे म्हटले जात आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तृप्तीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर कर्णेशसोबतचा एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये ती त्याला किस करताना दिसली होती. हा फोटो पाहून त्यांनी आपले नाते इंस्टाग्रामवर ऑफिशियल केले असल्याचे बोलले जात होते. याशिवाय तृप्ती कर्णेशसोबतचे आणखी फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

दोघांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले
आता दोघांचे सोशल मीडिया हँडल बघितले तर दोघांनीही एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. यासोबतच तृप्तीने कर्णेशसोबतचे तिचे इतर फोटोही डिलीट केले आहेत. त्याचवेळी कर्णेशने त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून तृप्तीचे बुलबुल पोस्टर हटवले आहे. मात्र, या गोष्टीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

कर्णेशचं आहे प्रॉडक्शन हाऊस
अनुष्का आणि कर्णेश यांनी मिळून क्लीन स्लेट फिल्म्स नावाचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले. अनुष्का काही काळापूर्वी त्याच्यापासून वेगळी झाली होती. तृप्तीने या प्रॉडक्शन हाऊसच्या दोन चित्रपटांमध्ये काम केले आहे. प्रॉडक्शन हाऊससोबतच्या संबंधांबद्दल बोलताना तृप्ती म्हणाली होती की, अनुष्का आणि कर्णेशसोबत काम करण्याचा अनुभव खूप छान होता. ते लोक खूप मेहनती आहेत. दोघेही बाहेरचे. या इंडस्ट्रीत दोघांचीही ओळख नव्हती. मात्र तरीदेखील दोघे अजिबात घाबरत नाहीत. ते ज्या प्रकारच्या चित्रपटांवर विश्वास ठेवतात, तसे चित्रपट बनवतात. ते लोक खूप प्रेरणा देतात. एक अभिनेत्री म्हणून मला त्यांच्याकडून खूप काही शिकायचे आहे.

वर्कफ्रंटबद्दल...
तृप्तीने २०१७ मध्ये 'पोस्टर बॉईज' या चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर तिला 'लैला मजनू' चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. संदीप रेड्डी वंगा यांचा 'अ‍ॅनिमल' हा तिचा आगामी चित्रपट आहे. यामध्ये रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना आणि बॉबी देओलही मुख्य भूमिकेत आहेत.

Web Title: Anushka Sharma's brother Karnesh Sharma and Tripti Dimri broke up?, unfollowed each other on Instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.