भारतीय संघ जिंकताच अनुष्काची प्रतिक्रिया होतेय व्हायरल, नवऱ्याला जवळ घेत प्रेमाचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 13:50 IST2025-03-10T13:49:00+5:302025-03-10T13:50:06+5:30
अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचा गोड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

भारतीय संघ जिंकताच अनुष्काची प्रतिक्रिया होतेय व्हायरल, नवऱ्याला जवळ घेत प्रेमाचा वर्षाव
Anushka Sharma Virat Kohli: भारतानं अखेर आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी २०२५ वर (Champions Trophy) आपलं नाव कोरलं. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने १२ वर्षांनंतर पुन्हा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर रविवारी ९ मार्चला खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियानं ४ विकेट राखून न्यूझीलंडवर (IND vs NZ) विजय मिळवला. या अंतिम सामन्यात न्यूझीलंडनं पहिली बॅटिंग करताना २५१ धावा केल्या होत्या. भारतानं हे आव्हान ४९ व्या ओव्हरमध्ये पूर्ण करून विजय मिळवला. त्यामुळे अर्थातच भारतीय फॅन्स खुश आहेत. टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव करताहेत. भारताच्या विजयानंतरचा अनुष्का शर्मा ( Anushka Sharma) आणि विराट कोहलीचा (Virat Kohli) व्हिडीओ व्हायरल होत आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याबद्दल विराटला मेडल देण्यात आलं. हे मेडल घेत विराट थेट अनुष्काकडे धावत गेला. तिला मिठी मारत अनुष्कासोबत त्यानं हा आनंद साजरा केला. यावेळी अनुष्कानं नवऱ्याला जवळ घेत त्याचे केस विस्कटून त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. दोघांचा हा गोड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चाहत्यांनीही या व्हिडीओवर प्रेमाचा वर्षाव केलाय.
They're so happy man 🧿😭❤️
— C ♡ (@viratkohligf) March 9, 2025
Even akaay nd vamika should have been there ☹️#virushkapic.twitter.com/086iX2FWgR
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली या जोडीचे चाहते जगभरात आहेत. विराटच्या कारकिर्दीतील प्रत्येक चढ-उतारात अनुष्का त्याच्यासोबत खंबीरपणे उभी राहिली आहे. कोहलीच्या संघर्षाच्या दिवसांमध्येही तिने त्याला नेहमीच प्रोत्साहन दिले. त्यामुळेच विराट नेहमीच त्याच्या विजयाचे श्रेय अनुष्काला देताना दिसून येतो. विरुष्काची रोमँटिक केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते. 'कपल गोल्स' देणारं हे जोडपं चाहत्यांचे मन नेहमीच जिंकते.
This moment!🏆❤️#AnushkaSharma hugged #ViratKohli after India's epic win in the #ICCChampionsTrophy2025 finals. #INDvsNZpic.twitter.com/QmEDAJcziu
— Filmfare (@filmfare) March 9, 2025