अनुष्का शर्माने रिपोर्टरचा मोबाइल घेऊन म्हटले, आंटी तुमची मुलगी माझा इंटरव्ह्यू घेत आहे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2017 20:05 IST2017-03-09T14:35:43+5:302017-03-09T20:05:43+5:30
अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या तिच्या आगामी ‘फिलौरी’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी वेगवेगळ्या प्रकारचे फंडे वापरीत आहे.

अनुष्का शर्माने रिपोर्टरचा मोबाइल घेऊन म्हटले, आंटी तुमची मुलगी माझा इंटरव्ह्यू घेत आहे!
अ िनेत्री अनुष्का शर्मा सध्या तिच्या आगामी ‘फिलौरी’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी वेगवेगळ्या प्रकारचे फंडे वापरीत आहे. काल-परवापर्यंत ऐतिहासिक घटना किंवा सिनेमांमध्ये स्वत:चा फोटो कोलार्ज करून सोशल मीडियावर मिरवणाºया अनुष्काने यावेळेस मात्र भलताच फंडा वापरला. सिनेमाच्या प्रमोशनसाठी आयोजित केलेल्या एका प्रेस मिटमध्ये तिने चक्क एका रिपोर्टरचा मोबाइल घेऊन त्या रिपोर्टरच्या आईशी बोलत ‘आंटी तुमची मुलगी माझा इंटरव्ह्यू घेत आहे’ असे म्हटले.
अनुष्काच्या या अचानक कृतीमुळे उपस्थित असलेले सगळेच दंग राहिले. त्याचे झाले असे की, त्या रिपोर्टरला तिच्या आईचा फोन येत होता. ही बाब जेव्हा अनुष्काला कळली तेव्हा तिला असे वाटले की, आईचा फोन मिस होऊ नये म्हणून तिने लगेचच त्या रिपोर्टरच्या हातचा फोन घेतला अन्, ‘आंटी तुमची मुलगी माझा इंटरव्ह्यू घेत आहे’ असे म्हटले.
गेल्या मंगळवारी अनुष्का शर्मा आणि दिलजीत दोसांझ मुंबई येथे ‘फिलौरी’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी मीडियाशी बोलत होते. यावेळी अनुष्का आणि दिलजीत यांच्यासमोर अनेक चॅनल्सचे माइक आणि रेकॉर्डसाठी मोबाइल ठेवलेले होते. अनुष्का या दरम्यान एका प्रश्नाचे उत्तर देत होती, तेव्हा अचानक समोर ठेवलेला एक फोन वाजला. फोनवर ‘मम्मा कॉलिंग’ असे तिला दिसले. हे बघताच अनुष्काने त्या रिपोर्टरचा फोन उचलला अन् म्हणाली की, हॅलो मी अनुष्का बोलते, आंटी तुमची मुलगी आता इंटरव्ह्यू घेत आहे. थोड्या वेळात ती तुम्हाला फोन करणारच, एवढे बोलून अनुष्काने फोन ठेवला.
अनुष्का तिच्या आगामी ‘फिलौरी’ या सिनेमात केवळ अॅक्टिंगच नव्हे तर ती या सिनेमाची प्रोड्यूसरदेखील आहे. अनुष्काच्या प्रॉडक्शन हाउसमध्ये बनणारा हा दुसरा सिनेमा असून, या अगोदर ‘एनएच-१०’ या सिनेमाची तिने निर्मिती केली आहे.