​अनुष्का शर्मा म्हणते, मी कोणतिही भूमिका साकारण्यास तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2017 20:24 IST2017-02-07T14:54:41+5:302017-02-07T20:24:41+5:30

निरागस प्रेमिका, प्रेमात दगा मिळविलेली मुलगी ते थेट कुस्तीपटू या सारख्या भूमिका साकारणारी अभिनेत्री अनुष्का शर्मा आगामी फिलौरी या ...

Anushka Sharma says, I am ready to play any role | ​अनुष्का शर्मा म्हणते, मी कोणतिही भूमिका साकारण्यास तयार

​अनुष्का शर्मा म्हणते, मी कोणतिही भूमिका साकारण्यास तयार

रागस प्रेमिका, प्रेमात दगा मिळविलेली मुलगी ते थेट कुस्तीपटू या सारख्या भूमिका साकारणारी अभिनेत्री अनुष्का शर्मा आगामी फिलौरी या चित्रपटात एका भूताच्या भूमिकेत दिसणार आहे. आपल्या भूमिके बद्दल अनुष्का शर्मा म्हणली, जर मला योग्य संधी मिळाली तर मी कोणतिही भूमिका साकारू शकते. 

अनुष्का शर्माने  ‘एै दिल है मुश्किल’मध्ये प्रेमाच्या दुहेरी मार्गावर उभ्या असलेल्या मुलीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाची प्रशंसा करण्यात आली होती. अनुष्का म्हणाली, एक अभिनेत्री म्हणून मला विविध भूमिका साकारता आल्या. यामुळे मी स्वत:ला नशीबवान समजते. माझ्या भूमिका चाहत्यांना पसंत पडल्या ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची व आनंदाची गोष्ट आहे. एक कलाकार म्हणून मी स्वत: वैविध्यपूर्ण भूमिका साकारण्याकडे माझा जादा कल असतो. कारण कलावंत म्हणून मी केवळ माझ्या अभिनयाने लोकांना प्रभावित करू शकते. कलावंतांनी साकारलेले पात्र लोकांना पसंत पडतात व ते त्याच्या प्रेमात पडतात. अभिनेत्री अनुष्का शर्माचा आगामी चित्रपट फीलौरी लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ती भूताच्या भूमिकेत दिसणार आहे. 



अनुष्का शर्मा हिच्या प्रोडक्शनखाली तयार होणारा फिलौरी हा दुसरा चित्रपट असून यापूर्वी तिने ‘एनएच-१०’ या चित्रपटाची निर्मिती केली होती व त्यात प्रमुख भूमिका देखील साकारली होती. फिलौरीच्या कथा निवडीबद्दल अनुष्का म्हणाली, माझा भाऊ करणेशच्या डोक्यात अशा कथानकाचा विचार आला होता. मलाही चित्रपटातून नवीन कथानक मांडायचे होते. फिलौरीला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. मी माझी भूमिका इमानदारीने साकारण्याचा प्रयत्न केला आहे असे अनुष्का शर्मा हिने सांगितले. 

फिलौरी या चित्रपटात दिलजीत दोसांझ, मेहरीन पीरजादा आणि सूरज शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

Web Title: Anushka Sharma says, I am ready to play any role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.