विराट कोहलीच्या वहिनीने शेअर केला योग साधनेचा फोटो, अनुष्का शर्माने जाऊबाईंचं केलं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 17:00 IST2025-10-22T17:00:29+5:302025-10-22T17:00:54+5:30
तुझा अभिमान वाटतो...; अनुष्का शर्माने जाऊबाईंवर उधळली स्तुतीसुमनं

विराट कोहलीच्या वहिनीने शेअर केला योग साधनेचा फोटो, अनुष्का शर्माने जाऊबाईंचं केलं कौतुक
अभिनेत्री अनुष्का शर्मा आपलं वैयक्तिक आयुष्य कायम खाजगी ठेवण्याचा प्रयत्न करते. सध्या ती सिनेसृष्टीपासून दूर आहे. विराट आणि मुलांसोबत आता ती लंडनलाच शिफ्ट झाली आहे. अनुष्का बऱ्याचदा तिच्या कुटुंबासोबत दिसते. मात्र विराटच्या कुटुंबियांसोबत तिचे फोटो दिसत नाहीत. यावरुन अनेकदा सोशल मीडियावर चर्चा झाली आहे. मात्र आता अनुष्काने विराट कोहलीच्या वहिनीचं म्हणजेच जाऊबाईंचं कौतुक करत पोस्ट शेअर केली आहे.
अनुष्का शर्माची जाऊ चेतना कोहली यांनी सोशल मीडियावर त्यांच्या योग करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. त्यांचं डेडिकेशन पाहून अनुष्काने तो फोटो स्वत: आपल्या इन्स्टाग्रामवर स्टोरीवर पोस्ट करत लिहिले, 'तिच्या प्रत्येक आसनात योग साधना दिसते. शक्ती आणि आकर्षकता, हालचाली आणि स्थिरता सगळंच सुसंगत आहे."
चेतना कोहली त्यांच्या इन्स्टाग्रामवर योग साधनेचे व्हिडिओ शेअर करत असतात. दिवाळी पोस्टमध्येही त्यांनी हा असाच योग साधनेचा फोटो पोस्ट केला ज्याचं आता अनुष्काही कौतुक करत आहेत. यावर चेतना यांनी अनुष्काचे आभार मानले आहेत. तसंच अनुष्काने जाऊबाईंचं एवढं कौतुक केल्याने विराटचे चाहतेही सुखावले आहेत.
चेतना कोहली विराटचा भाऊ विकास कोहलीची पत्नी आहे. विकास हा विराटचे बिझनेस बघतो. दोन्ही भावांमध्ये खूप प्रेम आहे तसंच त्यांच्या पत्नींमध्येही चांगला बाँड असल्याचं दिसून येतं. चेतना या कुटुंबासोबत दिल्लीत राहतात.