विराट कोहली वा आयफासाठी नाही तर ‘या’ कारणासाठी न्यूयॉर्कला गेलीय अनुष्का शर्मा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2017 15:16 IST2017-07-14T09:46:53+5:302017-07-14T15:16:53+5:30

काल-परचा अनुष्का शर्मा व विराट कोहलीचा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला. या फोटोसोबत एक बातमीही आली. ती म्हणजे, अनुष्का ...

Anushka Sharma goes to New York for 'this' purpose, not Virat Kohli or IIFA | विराट कोहली वा आयफासाठी नाही तर ‘या’ कारणासाठी न्यूयॉर्कला गेलीय अनुष्का शर्मा !

विराट कोहली वा आयफासाठी नाही तर ‘या’ कारणासाठी न्यूयॉर्कला गेलीय अनुष्का शर्मा !

ल-परचा अनुष्का शर्मा व विराट कोहलीचा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला. या फोटोसोबत एक बातमीही आली. ती म्हणजे, अनुष्का आणि विराट हे दोघे लव्ह बर्ड्स आयफा अवार्ड्सच्या निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये क्वालिटी टाईम घालवत असल्याची. पण असे नाहीच मुळी. होय, अनुष्का शर्मा केवळ विराटसोबत क्वालिटी टाईम घालवता यावा, म्हणून न्यूयॉर्कला गेलेली नाही. खरे सांगायचे तर आयफा अवार्डसाठीही गेलेली नाही. होय, न्यूयॉर्कमध्ये अनुष्का एका महत्त्वाच्या कामासाठी गेली आहे. या कामामुळे ती आयफा अवार्ड्समध्येही भाग घेऊ शकणार नाहीय. म्हणजेच न्यूयॉर्कमध्ये असूनही अनुष्का आयफा अवार्ड्स नाईटपासून दूर राहणार आहे. इंडस्ट्रीतील मित्रांसोबत वेळ घालवावा, असे अनुष्काचे कुठलेही मूड नाही. एकंदर काय, तर न्यूयॉर्कमध्ये अनुष्का वेगळ्याच कारणाने गेली आहे. हे कारण म्हणजे, रणबीर कपूर.

ALSO READ :  इंटरनेटवर अनुष्का शर्मा - विराट कोहलीच्या सेल्फीचा धूमाकुळ !!

ऐकता ते खरे आहे. अनुष्का शर्मा राजकुमार हिराणींच्या चित्रपटात दिसणार असल्याचे तुम्हाला ठाऊक आहेच. संजय दत्तच्या बायोपिकमध्ये तिचा महत्त्वपूर्ण रोल आहे आणि या बायोपिकमध्ये  रणबीर कपूर लीड भूमिकेत आहे. याच कारणाने अनुष्का न्यूयॉर्कमध्ये आहे. संजय दत्तच्या बायोपिकचे काही सीन्स ती इथे शूट करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय दत्तला ड्रग्जचे व्यसन लागते, त्या काळात अनुष्का या चित्रपटात एन्ट्री घेणार आहे. यात ती पत्रकाराच्या भूमिकेत आहे. याच सिनेमासाठी अनुष्का न्यूयॉर्कमध्ये आहे आणि यानिमित्ताने ती विराटसोबत काही क्षण घालवते आहे.
लवकरच अनुष्काचा ‘जब हॅरी मेट सेजल’ हा चित्रपट रिलीज होतो आहे. यात ती शाहरूखच्या अपोझिट दिसणार आहे.

Web Title: Anushka Sharma goes to New York for 'this' purpose, not Virat Kohli or IIFA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.