​अनुष्का शर्मा कुणामुळे झाली अभिनेत्री? जाणून घ्या !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2017 11:39 IST2017-07-23T06:09:26+5:302017-07-23T11:39:26+5:30

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा ‘जब हॅरी मेट सेजल’ हा चित्रपट लवकरच रिलीज होतोय. इम्तियाज अलीच्या या चित्रपटात अनुष्का व ...

Anushka Sharma Actress? Learn! | ​अनुष्का शर्मा कुणामुळे झाली अभिनेत्री? जाणून घ्या !

​अनुष्का शर्मा कुणामुळे झाली अभिनेत्री? जाणून घ्या !

लिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा ‘जब हॅरी मेट सेजल’ हा चित्रपट लवकरच रिलीज होतोय. इम्तियाज अलीच्या या चित्रपटात अनुष्का व शाहरूख खान हे दोघे लीड रोलमध्ये आहेत.   अनुष्काने आज बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये आज तिची गणना होते. पण याचे खरे श्रेय करिना कपूरला द्यायला हवे. होय, ‘जब हॅरी मेट सेजल’च्या ट्रेलर लॉन्चवेळी अनुष्काने खुद्दच हे सांगितले.  ‘मी बिकानेरमध्ये ‘जब वुई मेट’ हा सिनेमा पाहिला होता. मम्मी- पप्पासोबत मी हा चित्रपट पाहायला गेले होते. या चित्रपटात करिनाने साकारलेली गीतची भूमिका पाहून माझ्या मनात अभिनेत्री बनण्याचा विचार आला. गीतला पाहून आपणही चित्रपट करावेत, असे मला वाटले’, असे अनुष्काने यावेळी सांगितले. एकंदर काय, तर  करिनानेच अनुष्काला चित्रपटांत येण्यासाठी प्रोत्साहित केले.



‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाबद्दल अनुष्का बरीच उत्सुक दिसली. इम्तियाजसोबत काम करण्यासाठी मी बरीच वाट पाहिली. इम्तियाजने आॅफर केलेला हा पहिला चित्रपट होता. या चित्रपटाची आयडिया कमाल होती. त्यामुळे हा चित्रपट नाकारण्याचा प्रश्नच नव्हता. या चित्रपटात मी एका गुजराती मुलीची भूमिका साकारते आहे. या भूमिकेसाठी मी बरीच मेहनत घेतली.गुजराती डिक्शनसाठी एका गुजराती शिक्षकाची मदत घेतला. गुजराती उच्चार, लय, ढब सगळे काही शिकले. एकंदर हा चित्रपट माझ्या अतिशय जवळचा आहे. प्रेक्षकांनाही तो आवडेल, अशी अपेक्षा आहे, असे अनुष्का म्हणाली. आता अनुष्काच्या अतिशय जवळचा हा चित्रपट आपल्याला किती आवडतो, ते बघूच. तोपर्यंत प्रतीक्षा.

Web Title: Anushka Sharma Actress? Learn!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.