अनुष्का-रणवीरने केले ‘अश्रिता’चे स्वप्न पूर्ण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2016 22:19 IST2016-03-13T05:19:09+5:302016-03-12T22:19:09+5:30

प्रत्येक चाहत्याला त्याच्या आवडीच्या कलाकाराला भेटावेसे वाटते.

Anushka-Ranvir made dream of 'unity'! | अनुष्का-रणवीरने केले ‘अश्रिता’चे स्वप्न पूर्ण!

अनुष्का-रणवीरने केले ‘अश्रिता’चे स्वप्न पूर्ण!

रत्येक चाहत्याला त्याच्या आवडीच्या कलाकाराला भेटावेसे वाटते. पण कलाकारांचे बिझी शेड्यूल आणि त्यांच्या भोवती असलेल्या गर्दीमुळे अनेकांना मनात असूनही त्यांना भेटता येत नाही. पण जर तुम्हाला तुमच्या सेलिब्रिटीला भेटण्याची संधी मिळाली तर काय ? अक्षरश: तुमचा आनंद गगनातच मावणार नाही. हो ना? असेच काहीसे अश्रिता नावाच्या छोटुशा मुलीच्या स्वप्नाच्या बाबतीत झाले.

अनुष्का शर्माला भेटण्याचे तिचे स्वप्न होते. पण अशावेळी रणवीर सिंगने येऊन तिला सरप्राईज दिले. अश्रिता आणि तिच्या कुटुंबियांना किती आनंद झाला असेल याचा आपण विचार करू शकतो. ‘बँड बाजा बारात’ जोडी अनुष्का-रणवीर यावेळी एकमेकांसोबत खुपच कम्फर्टेबल वाटत होते. 

अनुष्का सध्या ‘सुल्तान’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. आणि रणवीर आदित्य चोप्रा यांच्या ‘बेफिके्र’ मध्ये व्यस्त आहे. अनुष्का सुल्तानमधील तिच्या भूमिकेसाठी खुप मेहनत घेत आहे. 




 

Web Title: Anushka-Ranvir made dream of 'unity'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.