अनुष्का ठेवतेयं सलमानच्या पावलावर पाऊल!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2016 17:35 IST2016-08-14T12:05:53+5:302016-08-14T17:35:53+5:30
गत अनेक वर्षांपासून ईद आणि सलमानचा सिनेमा हे समीकरण झाले आहे. ईदच्या मुहूर्तावर सलमानचा सिनेमा येणार म्हणजे येणारच. गतवर्षी ...

अनुष्का ठेवतेयं सलमानच्या पावलावर पाऊल!!
ग अनेक वर्षांपासून ईद आणि सलमानचा सिनेमा हे समीकरण झाले आहे. ईदच्या मुहूर्तावर सलमानचा सिनेमा येणार म्हणजे येणारच. गतवर्षी हे समीकरण थोडे बदललेले दिसले. म्हणजेच, ईदच्या मुहूर्तावर सलमानचा ‘बजरंगी भाईजान’ आलाच. पण यानंतर दिवाळीच्या मुहूर्तावरही त्याचा ‘प्रेम रतन धन पायो’ रिलीज झाला. म्हणजे ईद आणि दिवाळी हे दोन्ही सण सलमानने ‘कॅश’ केलेत. या वर्षांत सलमान प्रमाणेच एक बॉलिवूड अभिनेत्रीही ‘ईद’ आणि ‘दिवाळी’ हे दोन्ही सण ‘कॅश’ करताना दिसणार आहे. होय, ही अभिनेत्री म्हणजे अनुष्का शर्मा. अनुष्का शर्माचा ‘सुलतान’ हा यावर्षी ईदच्या मुहूर्तावर रिलीज झाला आणि यानंतर आता येत्या दिवाळीला तिचा ‘ऐ दिल है मुश्किल’ हा बहुप्रतिक्षीत सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘ऐ दिल है मुश्किल’ यंदाच्या अनेक मोठ्या चित्रपटांपैकी एक आहे. त्यामुळेच निश्चितपणे त्यास बिग ओपनिंग अपेक्षित आहे. बॉलिवूडमध्ये उणीपुरी आठ वर्षे झालेली अनुष्का ‘फेस्टिवल वीकेन्ड रिलीज’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणे, हे खचितच कमी नाही. सो, वेल डन अनुष्का!!