अनुष्का झालीय ‘busy girl’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 12:15 IST2016-10-13T12:52:37+5:302016-10-17T12:15:36+5:30
अनुष्का शर्मा सध्या जाम बिझी आहे. सध्या अनुष्का इम्तियाज अलीच्या ‘दी रिंग’च्या शूटींगमध्ये बिझी आहे.

अनुष्का झालीय ‘busy girl’!
अ ुष्का शर्मा सध्या जाम बिझी आहे. सध्या अनुष्का इम्तियाज अलीच्या ‘दी रिंग’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. गेल्या महिनाभरापासून अनुष्का शूटींगसाठी युरोपामध्ये आहे. याचदरम्यान करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’च्या डबिंगचे काम सुरु आहे. यानंतर लगेच या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये अनुष्का व्यस्त होणार आहे. याशिवाय काही कमर्शिअलचे शूटींगही आहेच. एकंदर काय, तर सध्या अनुष्का अक्षरश: कामात गढून गेली आहे. दोन दिवसांपूर्वीच अनुष्काने बुडापेस्टमध्ये काही कमर्शिअलचे शूटींग हातावेगळे केले. ‘दी रिंग’च्या शूटींगमधून जसा वेळ मिळेल तसा ती कमर्शिअलचे शूटींग करतेय. असाच वेळ काढून तिने ‘ऐ दिल है मुश्किल’च्या काही भागाचे डबिंग पूर्ण केले. ‘ऐ दिल है मुश्किल’च्या टीमच्या ती सतत संपर्कात आहे. युरोपमधील शूटींग शेड्यूल आटोपून अनुष्का मुंबईला परतणार आहे. यानंतर ती ‘ऐ दिल है मुश्किल’च्या प्रमोशनमध्ये बिझी होणार आहे. पण तरिही या व्यस्त वेळापत्रकाबद्दल अनुष्काला जराही तक्रार नाही. कितीही काम असो ते एन्जॉय करायचे, हेच जणू तिने ठरवलेय. वेल डन अनुष्का!!