अनुष्काची लगीनघाई!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2016 17:32 IST2016-12-08T17:32:39+5:302016-12-08T17:32:39+5:30
अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय खेळाडू विराट कोहली यांचं नातं काही बॉलिवूडपासून लपलेलं नाहीये. ते एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असून, लवकरच ...

अनुष्काची लगीनघाई!
अ िनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय खेळाडू विराट कोहली यांचं नातं काही बॉलिवूडपासून लपलेलं नाहीये. ते एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असून, लवकरच लग्न करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. अनुष्काला तर लगीनघाई एवढी झालीय की, एखाद्या उपवर मुलीप्रमाणे ती देखील लग्नासाठी तयार आहे. पण, दुसरीकडे करिअरचा विचार मनात डोकाविल्यावर लग्नाचा विचार मागे पडतो. सध्या माझ्यासाठी लग्नापेक्षा करिअर जास्त महत्त्वाचे असल्याचे ती सांगते.
![]()
लग्नाविषयीच्या आतुरतेबद्दल ती म्हणते,‘मी लग्नासाठी एकदम रेडी आहे. पण, माझे लग्न केव्हा होणार हे मला अद्याप माहित नाही. अजून मी त्याचा विचार केलेला नाही. आत्तापर्यंत मी प्रत्येक गोष्ट सामान्यपणे केलीयं. मग, लग्न हा तर माझा मुख्य अजेंडा असणार. ते विधी मी अगदी सर्वसामान्यपणे पूर्ण करणार. पण, आत्ता नाही. योग्यप्रसंगी मी लग्नाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद उपभोगणार आहे.’
![]()
‘लग्नानंतर अभिनेत्रींचं बॉलिवूडमधील करिअर संपतं असा गैरसमज आजही आहे. पण, लग्न, मुले झाल्यानंतरही अभिनेत्री योग्यप्रकारे त्यांचं करिअर करत आहेत. इंडस्ट्रीत अभिनेत्रींसाठी सध्याचा काळ खूप चांगलायं. अनुष्काही तिचे करिअर काही काळ सुरूच ठेवणार आहे. योग्य वेळ आल्यावर ती नक्कीच लग्नाचा विचार करीन, ’ असंही तिनं आवर्जून सांगितलेय.