ट्विटरवर अनुपम खेरच्या नावानं....चांगभल!!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 11:33 IST2016-02-04T06:03:11+5:302016-02-04T11:33:11+5:30

सोशल मीडियावर कुस्त्यांच्या आखाड्यांपेक्षा जास्त अ‍ॅक्शन पाहायला मिळते. कोणत्याही विषयावर व्यक्त होण्याचे सगळ्यात पॉवरफुल माध्यम म्हणजे ट्विटर. केवळ १४० ...

Anupam Kher's name on Twitter .... | ट्विटरवर अनुपम खेरच्या नावानं....चांगभल!!!

ट्विटरवर अनुपम खेरच्या नावानं....चांगभल!!!

शल मीडियावर कुस्त्यांच्या आखाड्यांपेक्षा जास्त अ‍ॅक्शन पाहायला मिळते. कोणत्याही विषयावर व्यक्त होण्याचे सगळ्यात पॉवरफुल माध्यम म्हणजे ट्विटर. केवळ १४० शब्दांत कोणाला ‘हीरो टू झिरो’ तर कोणाला ‘झीरो टू हीरो’ बनवते. ट्विटराटी कोणावर स्तुती सुमनंचा वर्षाव तर कोणाला तोंड लपवायला जागा सोडत नाही. सध्या गाजत असलेले पाकिस्तानी व्हिसा प्रकरणामुळे अनुपम खेर यांच्यावर लोकांनी फार मजेशीर ट्विट करून टीका केली आहे.

मंगळवारी सकाळी बातमी आली की, पाकिस्तान सरकारने अनुपम खेर यांना कराची साहित्य महोत्सवात सामील होण्यासाठी व्हिसा नाकारला आणि सगळेकडे वादळ सुरू झाले. पाकिस्तानने आपल्याला देशात येण्यास कशी परवानगी दिली नाही यावर अनुपम खेर यांनी आगतांडव करण्यास सुरुवात केली. नंतर पाकिस्तान हाय कमिशनने खुलासा केला की, खेर यांनी व्हिसाची औपचारिक मागणीच केलेली नव्हती. यावर यू-टर्न घेत अनुपम म्हणाले की, कराची साहित्य महोत्सवाच्या आयोजकांनी व्हिसाची मागणी केली परंतु सरकारने ती नाकारली.

आता याविषयावर ट्विटरवर काही फार मजेशीर ट्विट आले आहेत. त्यांपैकीच हे काही निवडक ट्विटस :

Tweeter

१. अनुपम खेर यांचा तमाशा आता दर आठवड्याला नाही तर डेली सोपसारखा रोज सुरू झाला आहे.
२. मला वाटले होते की, किरण बेदी ही बीजेपीसोबत घडलेली सर्वात वार्ईट गोष्ट होती; पण अनुपम खेर यांनी मला चुकीचे ठरविले.
३. काय विरोधाभास आहे बघा. व्हिसा नाकारला म्हणून भारतीय आनंदी तर कराची साहित्य महोत्सवाचे आयोजक दु:खी झाले आहेत.
४.आजकाल साहित्य संमेलन किंवा साहित्य महोत्सव साहित्यापेक्षा भलत्याच कारणासाठी प्रकाश झोतात येतात.

Web Title: Anupam Kher's name on Twitter ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.