अनुपम खेर यांच्या मातोश्रींचा 'श्रीवल्ली' गाण्यावर डान्स, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...So Cute!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 12:30 PM2022-02-15T12:30:47+5:302022-02-15T12:33:48+5:30

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जूनची मुख्य भूमिका असलेला 'पुष्पा' चित्रपटाची क्रेझ काही केल्या कमी होताना दिसत नाही. इन्स्टाग्राम रिल्समध्ये तर पुष्पा सिनेमातील गाणी आणि डायलॉग्सवर रिल्सचा नुसता पाऊस पडत आहे.

Anupam Khers mother Dulari Devi Dances on Allu Arjuns Srivalli Song in Viral Video | अनुपम खेर यांच्या मातोश्रींचा 'श्रीवल्ली' गाण्यावर डान्स, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...So Cute!

अनुपम खेर यांच्या मातोश्रींचा 'श्रीवल्ली' गाण्यावर डान्स, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...So Cute!

googlenewsNext

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जूनची मुख्य भूमिका असलेला 'पुष्पा' चित्रपटाची क्रेझ काही केल्या कमी होताना दिसत नाही. इन्स्टाग्राम रिल्समध्ये तर पुष्पा सिनेमातील गाणी आणि डायलॉग्सवर रिल्सचा नुसता पाऊस पडत आहे. यात आता ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या मातोश्रींचीही भर पडली आहे. अनुपम खेर यांच्या मातोश्री दुलारी देवी यांनी 'पुष्पा' सिनेमातील श्रीवल्ली गाण्यावर डान्स करताचा एक व्हिडिओ खेर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यावर युजर्स आणि अनुपम खेर यांचे चाहते देखील प्रतिक्रिया देत आहेत. 

सोशल मीडियावर तुम्ही सक्रिय असाल तर पुष्पा सिनेमातील श्रीवल्ली गाण्यातील हूक स्टेप सध्या किती व्हायरल झाली आहे याची कल्पना तुम्हाला असेलच. सर्वसामान्यांपासून बॉलीवूड कलाकारांपर्यंत प्रत्येकजण पुष्पातील गाणी आणि संवादांचे इन्स्टा रिल्स तयार करुन पोस्ट करत आहे. अनुपम खेर यांच्या आई दुलाी देवी यांचाही असाच एख व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तुमच्यातील टॅलेंटला वयाचं बंधन नसतं हेच या व्हिडिओतून दिसून येतं.

खेर यांच्या मातोश्रींनी श्रीवल्ली गाण्याची हूक स्टेप करत अनेकांची मनं जिंकली आहेत. दुलारी देवी यांचा हा व्हिडिओ सर्वात आधी अनुपम खेर यांच्या भाचीनं म्हणजेच वृंदा खेर यांनी पोस्ट केला होता. त्यानंतर अनुपम खेर यांनीही त्यांच्या अकाऊंटवर दुलारी देवी यांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. अनुपम यांनी त्यांच्या मातोश्रींचा व्हिडिओ शूट केल्याबद्दल वृंदा खेर यांचेही आभार मानले आहेत. अभिनेत्री कंगना रणौतनंही हा व्हिडिओ लाइक केला आहे. तर अनेकांनी व्हिडिओ खूप क्यूट असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी खेर यांच्या मातोश्री रॉकस्टार असल्याचं म्हटलं आहे. 

Web Title: Anupam Khers mother Dulari Devi Dances on Allu Arjuns Srivalli Song in Viral Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.